शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१,६५२ जलस्रोतांची रासायनिक पाणी नमुने तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 11:14 IST

Amravati : पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाची मोहीम; ग्रामपंचायतींना मिळणार कार्ड

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १,६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ मेपासून मोहीम सुरू झाली आहे. ३० मेपर्यंत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात जलस्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल भोरखडे यांनी दिली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या मान्सूनपूर्व स्रोतांची रासायनिक तपासणी याद्वारे होणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने जलसुरक्षा रक्षक, गावातील पाच महिला आरोग्यसेवक, आरोग्य सहायकांच्या सहकार्याने गोळा केले जात आहेत. संकलित पाणी नमुन्यांची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेतून केली जाणार आहे.

तालुकानिहाय पाणीपुरवठा स्त्रोतांची संख्याअचलपूर तालुक्यात १००, अमरावती १०९, अंजनगाव सुर्जी १२, भातकुली ७०, चांदूर बाजार ८०, चांदूर रेल्वे १२०, चिखलदरा २५९, दर्यापूर १३, धामनगाव रेल्वे ११७, धारणी २४१, मोर्शी १०२, नांदगाव खंडेश्वर १८८, तिवसा ११० व वरूड तालुक्यात १३१ जलस्त्रोतांची संख्या आहे.

गुणवत्ताधारित जोखीम निश्चितीजिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी प्रपत्र अ, ब, क तयार करून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात ९ आले असून, त्याद्वारे स्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित केली जाणार आहे.

स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जलस्रोतांच्या पाण्यामध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होते. त्यावर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागामार्फत उपाययोजना करू, नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, हाच प्रशासनाचा मुख्य हेतू आहे. - संतोष जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

कार्डाचे निकष असेलाल कार्ड : पाणी शुद्धीकरणात अनियमितता, जलस्रोताचा परिसर अस्वच्छ, नळ गळती, टीसीएल पावडर साठ्याची उपलब्धता नसणे, वर्षभरात साथरोगाचा उद्रेक, सर्वेक्षणात ७० व ७० पेक्षा जास्त गुणानुक्रमानुसार तीव्र जोखीम म्हणून स्रोत निश्चित. २हिरवे कार्ड : ज्या ग्रामपंचायतीमध्ये लाल कार्डचे निकष आढळून येत नाहीत, त्यांना हिरव्या रंगाचे कार्ड दिले जाते.पिवळे कार्ड : गावांमध्ये अस्वच्छता, स्वच्छता सर्वेक्षणात ३० व ६५ यांमध्ये गुणानुक्रम, मध्यम जोखीम म्हणून स्रोत निश्चित.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणAmravatiअमरावती