शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या बेलगाम करवसुलीला बसणार चाप

By admin | Updated: November 16, 2014 22:43 IST

ग्रामपंचायतीद्वारा बांधकामाच्या दर्जासह प्रतीचौरस फुटानुसार इमारतीवर व खुल्या जागेवर कर आकारणी करण्यात येत आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची प्रचलित

गजानन मोहोड - अमरावतीग्रामपंचायतीद्वारा बांधकामाच्या दर्जासह प्रतीचौरस फुटानुसार इमारतीवर व खुल्या जागेवर कर आकारणी करण्यात येत आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची प्रचलित पध्दत घटनाबाह्य ठरविली आहे. न्यायालयाचा या निर्णयाचा ग्रामपंचायतींना चांगला फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बेलगाम वसुलीस चाप लागणार आहे.न्यायालयाच्या या निर्णयाबाबत शासन आव्हान याचिका दाखल करणार किंवा फेरविचार याचिका दाखल करणार हे तूर्तास गुलदस्त्यात आहे. सध्या शासनाने सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेला शासनाचे अद्याप कुठलेच आदेश प्राप्त नाही. मात्र हा विषय ऐकिवात आहे व शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती जिल्हा परिषद सूत्रांनी दिली.जिल्ह्यात ९३५ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींद्वारा दर्जानुसार प्रतीचौरस फुटाप्रमाणे इमारती व मोकळ्या जागेवर कराची आकारणी सन २००० पासून करण्यात येत आहे. या कर आकारणीच्या पध्दतीमध्ये शासनाच्या निर्धारित नियमांच्या चौकटीत राहूनच कर निश्चित करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे. तसे पाहता नागरिकांवर बोजा पडू नये यासाठी कमी कर आकारणीची ग्रामपंचायतींची मानसिकता आहे. वर्षाला एकदा तरी मालमत्ता कर भरावा लागतो. याशिवाय ग्रामपंचायतींचे विविध करदेखील असतात. ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते. या कराद्वारे मिळणाऱ्या निधीतून ग्रामपंचायती आपला विकास साध्य करतात.गावात मूलभूत सुविधांची निर्मिती व्हावी याकडे ग्रामपंचायतींचा कल असतो. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायती आपल्या अधिकार क्षेत्रामधील मालमत्ता कर अधिकाधिक वसुली करण्याकडे लक्ष केंद्रित करतात. मात्र याविषयी मराठवाड्यामधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सन २००१ मध्ये जनहित याचिका दाखल करुन आव्हान दिले. याविषयीचा निवाडा याच आठवड्यात बाहेर आला आहे. तूर्तास प्रशासनाने यावर सावध भूमिका घेतली आहे व सध्याच्या प्रयलीत पद्धतीनुसारच कर आकारणी व वसुली होत आहे.