शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

अमरावती/ संदीप मानकर वीज मीटरमध्ये फेरफार आढळल्यास दंडस्वरूपात मोठी किंमत मोजावी लागते. मीटर जप्तीचीसुद्धा कारवाई किंवा वीज वापरानुसार हजार ...

अमरावती/ संदीप मानकर

वीज मीटरमध्ये फेरफार आढळल्यास दंडस्वरूपात मोठी किंमत मोजावी लागते. मीटर जप्तीचीसुद्धा कारवाई किंवा वीज वापरानुसार हजार रुपयापासून लाखो रुपयांचा दंडसुद्धा वीज ग्राहकांना होऊ शकतो. तसेच वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधारसुद्धा होऊ शकतो. गत पाच महिन्यात महावितरणच्या पथकाने वीज ग्राहकांवर धाडी टाकून २२१ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्याकरिता महावितरणतर्फे वेळोवेळी धडक मोहीमसुद्धा राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

२०१९-१०७३

२०२०-५६२

२०२१-२२१

बॉक्स:

कधीही होऊ शकते मीटरची तपासणी

वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्यास घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांवर धाडी टाकून महावितरणचे अधिकारी किंवा भरारी पथक कधीही धाड टाकून वीज ग्राहकांची तपाणी करू शकतात. ज्या कामासाठी वीज घेतली आहे, त्याचा वापर आढळून न आल्यास किंवा वीज चोरी पकडल्यास दंडात्मक कारवाई किंवा तडजोड शुल्क न भरल्यास एफआयआरसुद्धा करण्यात येतो.

बॉक्स:

मीटर जप्त अन लाखो रुपयांचा दंड

१) मीटरमध्ये फेरफार केल्यास मीटर जप्त किंवा विजेचा वापर किती केला त्यानुसार एक हजारापासून तर लाखो रुपयांचा दंड आकारल्या जाऊ शकतो.

२) विद्युत कायदा २००३ अंतर्गत कलम १३५ नुसार कारवाई केली जाते. ग्राहकांना तडजोड शुल्क भरण्याची संधी दिली जाते. जर तडजोड शुल्क भरला नाही तर एफआयआरसुद्धा केला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट