शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरच्या पोळ्याला स्वातंत्र्यपूर्व परंपरा

By admin | Updated: August 24, 2014 23:13 IST

जेथे हनुमानाचे मंदिर तेथे बैलांचा पोळा भरण्याची परंपरा चांदूरबाजार तालुक्यात अनादी काळापासून सुरू आहे. यांत्रिक शेतीने बैलाचे काम कमी केले असले तरी काही शेतकऱ्यांकडे आजही बैल आहेत.

सुरेश सवळे - चांदूरबाजारजेथे हनुमानाचे मंदिर तेथे बैलांचा पोळा भरण्याची परंपरा चांदूरबाजार तालुक्यात अनादी काळापासून सुरू आहे. यांत्रिक शेतीने बैलाचे काम कमी केले असले तरी काही शेतकऱ्यांकडे आजही बैल आहेत. पूर्वी पोळ्यात हजारो बैल जमायचे. कालांतराने त्यांची संख्या घटून शेकडोवर आली. काही गावात तर एखाद-दोन शेतकऱ्यांकडे बैलजोडी असल्यामुळे त्यांना पोळ्याच्या दिवशी हनुमान मंदिरात पूजेसाठी नेण्याचे सोपस्कार पाळले जाते. चांदूरबाजारात बैलांना पोळ्यातील घाट लावण्याचा मान येथील काकडे व राऊत पाटलांकडे वंश परंपरा चालत आलेली असून आजही ती कायम आहे.चांदूरबाजारातील पोळा हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावातील हनुमान चौकातील हनुमान मंदिरालगत भरविला जातो. याठिकाणी पूर्वीपासूनच हनुमानाचे लहानसे देऊळ होते. त्या देवळाच्या परिसरात सर्व शेतकऱ्यांच्या बैलजोड्या गोळा व्हायच्या. यात पहिली जोडी नेमकी कोणी सोडायची यासाठी मानपानाचे मोठे महत्त्व होते. या मानासाठी पाटलाच्या दोन गटांत मारामाऱ्या झाल्याचाही अनुभव नामदेवराव राऊत या ७२ वर्षीय पोळ्याचा मान असलेल्या पाटलाने सांगितले. स्वातंत्र्यानंतर मात्र असा प्रसंग घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.पोळ्याच्या पहिल्या दिवसाला ‘खालमानी’ म्हणून संबोधले जाते. या दिवशी शेतकऱ्यांकडून बैलजोडीची सेवा केली जाते. त्याच्या एका वर्षाच्या श्रमामुळे त्याच्या खांद्याला जे व्रण आले असतात त्यावर तूप लावून त्याची आंघोळ घातली जाते व त्याला पोळ्याच्या दिवशीची परंपरा हिन्दू-मुस्लीम सर्व जाती-धर्माच्या शेतकऱ्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. एकदा मोवाड वाहून अतिवृष्टीचा परिणाम पोळा भरण्यावर झाला. पोळ्यात बैलजोड्या सजवून आणले जाते. इतर ठिकाणी अशा सजवलेल्या बैलजोड्यांना सजावटीचा पुरस्कार दिला जातो. मात्र चांदूरबाजारात या उपक्रमाला मागील वर्षीपासून सुरुवात झाली. जय श्रीराम क्रीडा व्यायाम मंडळाव्दारा संचालित सियाराम हेल्थ क्लबतर्फे आकर्षक बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पोळ्यात अधिक संख्येने बैलजोड्या येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या क्लबचे अध्यक्ष गोपाल तिरमारे यांनी दिली. यावर्षी या स्पर्धेतील उत्कृष्ट बैलजोडीला अनुक्रमे ३,२, २असे चांदिचे सिक्के नगराध्यक्ष शुभांगी देशमुख, नगरसेविका मीनाक्षी औतकर व बाबुराव काकडे यांच्यातर्फे देण्यात येणार असून बैलजोडीधारक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.