Chhatrapati Sambhajinagar Crime News: दोन मुलांची आई असलेल्या ३० वर्षीय महिलेची इन्स्टाग्रामवर लव्ह स्टोरी सुरु झाली, पण गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला धोका दिला. लग्न करूयात म्हणून आरोपीने महिलेसोबत अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले. आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
रेहान मोहम्मद शेख असे आरोपीचे नाव असून, तो छत्रपती संभाजीनगर जवळील राजनगाव येथील असून, पीडित महिला अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तपासासाठी हे गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.
पतीला सोडलं, इन्स्टाग्रामवर प्रेम
३० वर्षीय पीडित महिलेचा विवाह झाला होता. तिला ८ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे ती विभक्त झाली. त्यानंतर ती मुलांसह अमरावती येथे आईकडे राहायची.
एप्रिल २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर या महिलेची ओळख रेहान मोहम्मद शेख याच्याशी झाली. इन्स्टाग्रामवर मेसेज झाल्यानंतर दोघांनी मोबाईल नंबर एकमेकांना दिले. त्यानंतर दोघांमधील संवाद वाढत गेले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले.
राजनगावला बोलावून दोन दिवस शरीरसंबंध
आरोपीने महिलेला लग्न करून म्हणून विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला १९ मे २०२५ रोजी अमरावतीवरून छत्रपती संभाजीनगरला बोलावले. तिथून महिलेला तो राजनगावला घेऊन गेला. तिथे दोन दिवस त्याने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले.
आरोपीने अमरावतीला गेला. महिलेला तिच्या आईच्या घरी जाऊन भेटला. तिथेही त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर महिला गर्भवती राहिली. तिने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र आरोपीने लग्नास नकार देण्यास सुरूवात केली.
आरोपीने महिलेकडे गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. तू गर्भपात केला नाही, तर जिवे मारेन अशी धमकी दिली. आरोपीकडून धमक्या दिल्या जात असल्याने महिलेने अमरावतीतील फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा वाळूज एमआयडीसीकडे पोलिसांकडे वर्ग केला.
Web Summary : A 30-year-old mother of two in Chhatrapati Sambhajinagar was cheated by her Instagram lover after becoming pregnant. The accused, Rehan Mohammed Sheikh, had promised marriage and then threatened her. A police case has been registered and transferred for investigation.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में दो बच्चों की 30 वर्षीय माँ को इंस्टाग्राम प्रेमी ने गर्भवती होने के बाद धोखा दिया। आरोपी रेहान मोहम्मद शेख ने शादी का वादा किया और फिर उसे धमकी दी। पुलिस में मामला दर्ज, जांच जारी।