दोन मुलांच्या आईला त्याने इन्स्टावर मेसेज केला; प्रेम प्रकरण सुरू झाले अन् गर्भवती राहताच महिलेसोबत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:53 IST2026-03-18T13:51:03+5:302026-03-18T13:53:13+5:30
Chhatrapati Sambhajinagar Crime: अमरावती येथील एका ३० वर्षीय महिलेला प्रेमाचे आमिष दाखवून अनेकवेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रेम प्रकरणातून महिला गर्भवती राहिली. पण, आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.

दोन मुलांच्या आईला त्याने इन्स्टावर मेसेज केला; प्रेम प्रकरण सुरू झाले अन् गर्भवती राहताच महिलेसोबत...
Chhatrapati Sambhajinagar Crime News: दोन मुलांची आई असलेल्या ३० वर्षीय महिलेची इन्स्टाग्रामवर लव्ह स्टोरी सुरु झाली, पण गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला धोका दिला. लग्न करूयात म्हणून आरोपीने महिलेसोबत अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले. आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
रेहान मोहम्मद शेख असे आरोपीचे नाव असून, तो छत्रपती संभाजीनगर जवळील राजनगाव येथील असून, पीडित महिला अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तपासासाठी हे गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.
पतीला सोडलं, इन्स्टाग्रामवर प्रेम
३० वर्षीय पीडित महिलेचा विवाह झाला होता. तिला ८ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे ती विभक्त झाली. त्यानंतर ती मुलांसह अमरावती येथे आईकडे राहायची.
एप्रिल २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर या महिलेची ओळख रेहान मोहम्मद शेख याच्याशी झाली. इन्स्टाग्रामवर मेसेज झाल्यानंतर दोघांनी मोबाईल नंबर एकमेकांना दिले. त्यानंतर दोघांमधील संवाद वाढत गेले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले.
राजनगावला बोलावून दोन दिवस शरीरसंबंध
आरोपीने महिलेला लग्न करून म्हणून विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला १९ मे २०२५ रोजी अमरावतीवरून छत्रपती संभाजीनगरला बोलावले. तिथून महिलेला तो राजनगावला घेऊन गेला. तिथे दोन दिवस त्याने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले.
आरोपीने अमरावतीला गेला. महिलेला तिच्या आईच्या घरी जाऊन भेटला. तिथेही त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर महिला गर्भवती राहिली. तिने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र आरोपीने लग्नास नकार देण्यास सुरूवात केली.
आरोपीने महिलेकडे गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. तू गर्भपात केला नाही, तर जिवे मारेन अशी धमकी दिली. आरोपीकडून धमक्या दिल्या जात असल्याने महिलेने अमरावतीतील फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा वाळूज एमआयडीसीकडे पोलिसांकडे वर्ग केला.