शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देपहाटे ४ पासून रांग, फिजिकल डिस्टन्सचा अभाव, गर्दीमुळे वाढला कोरोनाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात लसीकरणाच्या १३५ केंद्रांवर अलीकडे पहाटे ४ पासून रांगा लागत आहेत. बहुतेक केंद्रांवर शेकडो नागरिकांच्या रांगेत फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोना प्रतिबंधासाठी की संसर्गवाढीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही केंद्रांवर रांगा आहेत. या रांगेत एखादा असिम्टमॅटिक  रुग्ण आल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे.महापालिका क्षेत्रात १८ व ग्रामीणमध्ये ११७ केंद्रांवर सद्यस्थितीत पाच टप्प्यांमधील लसीकरण होत आहे. आतापर्यंत ३,५२,४०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सुरुवातीच्या काळात १६ जानेवारीला हेल्थ लाईन वर्कर व त्यानंतर फ्रंट लाइन वर्कर या दोन टप्प्यात लसीकरण करण्यात आले. साधारणपणे ६२,३१५ लाभार्थींनी या गटात लस घेतली आहे. यावेळेस जिल्ह्यात केवळ २० ते २२ केंद्र असताना केंद्रांवर रांगा नव्हत्या. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केंद्रे वाढली व केंद्रांवर गर्दीदेखील वाढायला लागली. काही दिवसांनंतर ४५ वर्षांवरील कोमार्बिडीटी आजारांच्या रुग्णांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर पुन्हा काही केंद्रे नव्याने  सुरु करण्यात आली. आता १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. या गटासाठी स्वतंत्र केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. ऑनलाईन नोंदणी व अपाॅईंटमेंट असल्यामुळे या केंद्रांवर फारशी गर्दी नाही. मात्र, लिंक सुरु होत नाही. केंद्रांवर क्लिक करण्यापूर्वीच बुक झालेली दाखवितात. ऑनलाईन नोंदणी केव्हा सुरू होणार, याची पूर्वसूचना दिली जात नाही व दोन मिनिटांत केंद्र हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा आरोप होत आहे.

रँडम सर्वेक्षणात दोन टक्के पॉझिटिव्हजिल्ह्यात निवडणूक निमित्ताने १० हजारांवर कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली कोरोना चाचणी, याशिवाय रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचण्या यामध्ये दोन ते तीन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या शेकडो नागारिकांच्या रांगेतही काही पॉझिटिव्ह आहेत. हे गृहीत धरून फिजिकल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे असताना, तसे होताना दिसत नाही.

अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवडलसीकरण केंद्रांवर अंपगांसह ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. बहुतांश केंद्रांवर प्रसाधनगृह, पाणी व सावलीसाठी सुविधा नाही. मिळेल तेवढ्याच सावलीच्या आडोशाने नागरिक दाटीवाटीने उभे राहतात. जास्तच गर्दी वाढल्यास केंद्रांवर पोलिसांना पाचारण केले जाते. केंद्रावर महिलांचीदेखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप होत आहे. अपंगांकरिता विशेष सुविधा कुठेही उपलब्ध नाहीत. 

गर्दी ओसरल्यावर पुन्हा टोकन वाटपकेंद्रांवर गर्दी कमी होण्यासाठी उपलब्ध लसींच्या प्रमाणात नागरिकांना टोकनचे वाटप करण्यात येते. त्यामुळे डोज संपल्याचे गृहीत धरून नागरिक केंद्रांवरून घरी जातात. त्यानंतर काही वेळाने पुन्हा टोकन देण्याचा प्रकार काही केंद्रांवर घडला. डोससाठी नंबर लागेल, या आशेने रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा देण्यात येणारे टोकन कोणासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस