शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन उत्साहात

By admin | Updated: December 31, 2014 23:17 IST

‘जुने जाऊ द्या सरणालागून...जाळून अथवा गाडून टाका...सावध ऐका पुढल्या हाका...’ असे म्हणत अमरावतीकरांनी २०१४ ला बाय-बाय करून २०१५चे जल्लोषात स्वागत केले.

अमरावती : ‘जुने जाऊ द्या सरणालागून...जाळून अथवा गाडून टाका...सावध ऐका पुढल्या हाका...’ असे म्हणत अमरावतीकरांनी २०१४ ला बाय-बाय करून २०१५चे जल्लोषात स्वागत केले.
नववर्षाच्या स्वागताचा ज्वर दोन दिवसांपासूनच अमरावतीकरांमध्ये दिसून आला. विशेषत: तरूणांनी त्यांच्या परीने नववर्षाच्या स्वागताचे प्लॅनिंग केले. शहरातील बार, रेस्टॉरेंट्समध्ये आगाऊ बुकिंग करून पार्ट्या करण्यात आल्या. शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरेंट्सवर नववर्षानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. घरोघरी कौटुुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जुन्या वर्षातील कटू आठवणींच्या स्मृती विस्मरणात टाकून नव्या वर्षातील संकल्प सोडण्याची प्रथा आहे. अनेकांनी यंदाही या प्रथेचे पालन केले. कित्येकांनी नववर्षानिमित्त धार्मिकस्थळी जाऊन धार्मिक अनुष्ठानही आयोजित केले होते. ३१ डिसेंबरची दुपार बऱ्याच कुटुंबांनी शहरातील पिकनिक स्पॉटवर घालवली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आपापल्यापरीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅप आणि भ्रमणध्वनीवर शुभेच्छा संदेशांचे आदान-प्रदान दोन दिवस आधीपासूनच सुरू झाले होते. तरूणाईने अनेक ठिकाणी थिमबेस पार्ट्यांचे आयोजन केले होते.
थर्टीफर्स्टच्या उत्साहात मद्यपींनी गोंधळ घालू नये आणि अपघात घडू नयेत, यासाठी पोलिसांद्वारे शहरात कडक बंदोबस्त करण्यात आला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. भन्नाट वेगाने बाईक पिटाळत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या तरूणांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस सज्ज होते.