शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीची अट रद्द, ग्रामपंचायतींना दिलासा

By admin | Updated: August 3, 2014 23:05 IST

ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी ठेवण्यात आलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना

पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी : वेळेत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्टअमरावती : ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी ठेवण्यात आलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीस गती मिळाली आहे. ग्रामपंचायती अंतर्गत गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. योजनेतील लोकसहभागासाठी दहा टक्के लोकवर्गणी जमा करण्याची अट होती परंतु योजनांच्या कामाच्या किमती पाहता तसेच ग्रामस्थांकडून लोकवर्गणी गोळा करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने लोकवर्गणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य शासनाच्या नियोजित निधी दिला जातो. परंतु बहुतांश पाणीपुरवठा योजना लोकवर्गणीअभावी निष्फळ झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे लोकवर्गणीची अट पूर्णत: रद्द करून ठराविक कालावधीत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले आहे. यापूर्वी ज्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीची रक्कम जमा करण्यात आली ती स्थानिक स्वराज्य संस्था अथवा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेस परत केली जाणार नाही; तथापी अशा पाणीपुरवठा योजनांमधील उर्वरित लोकवर्गणीची तरतूद पाणीपुरवठा योजनांच्या किमतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे नियोजन अंमलबजावणी देखभाल दुरूस्ती या तीनही भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग येत असल्यामुळे शासनाने लोकसहभागाचे धोरण अबाधित ठेवले आहे. लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीस गती येणार आहे. गरजू गावांनी पाणी पुरवठा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)