शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पोटेंची जमीन खरेदी रद्द करा

By admin | Updated: May 28, 2016 00:02 IST

पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खरेदी केलेले सर्व्हे क्रमांक ५७(१) चे ले-आऊट अवैध असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत पुन्हा केला.

पत्रपरिषद : तक्रारकर्त्यांची मागणीअमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खरेदी केलेले सर्व्हे क्रमांक ५७(१) चे ले-आऊट अवैध असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत पुन्हा केला. यासंबंधाने शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही या शेतकऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रपरिषदेत दिलेल्या निवेदनानुसार, तक्रारकर्त्यांनी सर्व्हे क्रमांक ५७ चे मालक अंबा ट्रेडर्स यांच्याकडून भूखंड खरेदी केले. अंबा ट्रेडर्स ही भागिदारी फर्म आहे. सत्यनारायण रामगोपाल अग्रवाल आणि राजू श्यामराव देऊळकर हे त्याचे भागिदार आहेत. भागिदारांनी तेच प्लॉट पुन्हा पोटे यांना विकले. २२ मे २०१६ रोजी काढलेल्या सर्व्हे क्रमांक ५७ च्या सातबाऱ्यात प्रवीण पोटे यांच्या नावाचा उल्लेख आहे. २८ वर्षांपूर्वी आम्ही केलेली खरेदी नियमाप्रमाणे आहे. त्यानंतरची पोटे यांची खरेदी नियमबाह्य आहे. नंतरच्या खरेदीचा फेरफार रद्द करून आमच्या खरेदीचा फेरफार करावा, अशी मागणी शांताकुमार बोबडे, भानुदास आखरे, पार्वताबाई गुप्ता, चारुशिला गुल्हाने, चिदंबरम कुट्टी, शोभा लोखंडे, अशोक गुप्ता, अरूण कुयरे, दत्ताराम गुल्हाने, शालिनी शिंदे, अरूण गुलवाडे यांनी पत्रपरिषदेत केली. अमरावतीचे जिल्हाधिकारी, अमरावतीबाहेरील अधिकारी आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांची समिती गठित करून या प्रकरणाची सखोल चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली. सदर प्रकरणात दिवाणी दावा दाखल करणे, हा कायदेसंगत मार्ग उपलब्ध असतानाही, २८ वर्षांत पोटे यांच्याविरुद्ध तसा दावा दाखल का केला नाही, या प्रश्नाला तक्रारकर्ते उत्तर देऊ शकले नाहीत. खरेदीत व्यक्तिगतरीत्या फसवणूक झाल्याचा जाहीर आरोप करताना त्यासाठीचा प्रमुख पुरावा असलेली खरेदी व्यवहाराची प्रत मात्र आरोपकर्त्या ११ व्यक्तींपैकी एकानेही निवेदनासोबत दिली नाही. पत्रकारांनी मागणी केल्यानंतरही ती उपलब्ध करून देण्यात आली नाही.