शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मद्याची वाहतूक रोखण्यासाठी इन कॅमेरा तपासणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 20:16 IST

मध्यप्रदेश सीमेवर संयुक्त गस्त : वर्धा, यवतमाळ जिल्ह्याकडेही लक्ष

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात प्रवेशित राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हे पथक गस्तीवर असणार आहे.अवैध दारू विक्री आणि मध्यप्रदेशात उत्पादित कमी महसूल आकारण्यात येणारी दारू आणण्यासाठी अनेकजण फंडा वापरतात.

गणेश वासनिक

अमरावती - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना चालविल्या आहेत. निवडणुकीदरम्यान सीमेलगतच्या राज्यांतून अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग इन कॅमेरा तपासणी करणार आहे. तसेच ‘फ्लाइंग स्कॉड’चे गठन केले आहे. अमरावती जिल्ह्यात प्रवेशित राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हे पथक गस्तीवर असणार आहे.अवैध दारू विक्री आणि मध्यप्रदेशात उत्पादित कमी महसूल आकारण्यात येणारी दारू आणण्यासाठी अनेकजण फंडा वापरतात. मात्र, विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो. त्याकरिता सीमेलगतच्या राज्यातून स्वस्त किंमतीची दारू आणली जाते, हे यापूर्वी एक्साईजने राबविलेल्या धाडसत्रातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे. गत दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अवैध मद्य विक्री आणि पैशाची वाहतूक रोखण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यानुसार अमरावती येथील एक्साईजने तीन निरीक्षक असलेले ‘फ्लाइंग स्कॉड’ नेमले आहेत. मध्यप्रदेश सीमेसह आंध्रप्रदेशातून येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी करताना ती इन कॅमेरा केली जाणार आहे. विशेषत: यवतमाळ, वर्धा मार्गावरील वाहनांच्या तपासणीला प्राधान्य दिले जाणार आहे.

मद्य विक्रेत्यांची संयुक्त बैठकअमरावती जिल्ह्यातील घाऊक व ठोक मद्य विक्रेत्यांची येत्या आठवड्यात दारू विक्री, साठवणूक आणि वाहतूक नियमांचे काटोकोरपण पालन होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वतंत्र बैठक घेणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली आहे. दारू साठवणीच्या गोदामांवर सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. दारू गोदामाची कोणत्याही क्षणी एक्साईजचे निरीक्षक अथवा अधीक्षक तपासणी करतील, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एक्साईज नाक्यांवर इन कॅमेरा वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

 

अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी फिरते पथक गठित करण्यात आले आहे. स्वतंत्र कर्मचारी नेमणूक होणार असून, नाक्यांवर जागते रहो, असे कर्तव्य बजावण्याचे निर्देश दिले आहे. विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी एक्साईजने उपाययोजना चालविल्या आहेत. - राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अमरावती

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागAmravatiअमरावतीPoliceपोलिसliquor banदारूबंदी