शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचे भाव वधारल्याने घरांचे बांधकाम ठप्प

By admin | Updated: January 7, 2016 00:32 IST

प्रत्येकजण आपल्या स्वप्नातील घर बांधण्याकरिता पोटाला चिमटा घेऊन एक एक पैसा गोळा करुन आपल्या स्वप्नातले घर तयार करतात.

चांदूरबाजार : प्रत्येकजण आपल्या स्वप्नातील घर बांधण्याकरिता पोटाला चिमटा घेऊन एक एक पैसा गोळा करुन आपल्या स्वप्नातले घर तयार करतात. आज हे बांधकाम करण्याकरिता गलेलठ्ठ पैसा लागतो. सद्यस्थितीत रेती व गिट्टीचे दर गगनाला भिडल्याने घरांचे बांधकाम ठप्प पडले आहे. ‘एक बंगला बने न्यारा’ या गाण्याप्रमाणेच प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे, अशी मनापासून इच्छा असते. त्याकरिता प्रत्येकजण आपले घर नावीन्यपूर्ण असावे, याकरिता बांधकामावर मोठा खर्च करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बांधकाम साहित्याचे दर वाढतच चालले आहेत. अलिकडे तर रेतीचे भाव गगनाला भिडल्याने बांधकामे ठप्प पडल्याचे चित्र आहे. कोणतेही बांधकाम करताना सर्वात जास्त प्रमाणात रेती व गिट्टीचा उपयोग केला जातो. मात्र, यावर्षी रेती व गिट्टीचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे स्वत:चे घर बांधण्याचे सर्वसाधारण नागरिकांचे स्वप्न हवेतच विरत आहे. महागाई आकाशाला भिडली असताना घरबांधणीसाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव कमालीचे वाढले आहे. घरबांधकामात सर्वात स्वस्त असणाऱ्या रेतीचे भाव यावर्षी ५००० ते ५५०० रुपये प्रती ब्रासवर पोहचल्याने आता १ ट्रक रेती १० ते ११ हजार रुपयांना मिळणार आहे.एकेकाळी रेतीला कोणतेही भाव नव्हते. शासनाचा कोणताही कर नसल्यामुळे ती मोफतच मिळत होती. मात्र, आज रेतीच्या भावांमुळे बांधकाम करु इच्छिणाऱ्या सामान्य माणसांनी धास्ती घेतल्याचे चित्र आहे. अलिकडे रेतीघाटांचे लिलाव चढ्या दराने होत आहेत. त्यामुळे रेतीचे भाव दरवर्षी वाढतच आहेत. शासनाने एकीकडे रेती घाटापासून पैसा वसुली करण्याचे धोरण अवलंबिले असताना दुसरीकडे कंत्राटदाराने त्यापासून नफा मिळण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यावर्षी रेतीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. तुर्तास लोकांना दर कमी होण्याची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)