शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल अधिकाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन

By admin | Updated: September 18, 2014 23:27 IST

दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन अमरावती जिल्हा शाखेच्यावतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी भारत दूरसंचार निगम लिमिटेड, श्याम चौक येथील

अमरावती : दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन अमरावती जिल्हा शाखेच्यावतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी भारत दूरसंचार निगम लिमिटेड, श्याम चौक येथील मुख्य कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे देण्यात आले.बीएसएनएलच्या स्थापणेपासून आजतागायत रखडलेले अधिकारी वर्गाचे प्रलंबित प्रश्न व बीएसएनएलच्या व्यवस्थापनाचे वेळकाढू धोरण याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्ह्यातील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन केले. दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन न्यू दिल्ली यांच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयात धरणे आंदोलन होत आहे. कंपनी तोट्यात असल्यामुळे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना योग्य वेतन व पदोन्नती देता येत नाही या व्यवस्थापनेच्या धोरणाला अधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. दूरसंचार अधिकाऱ्यांना ई-२ प्रमाणे वेतनश्रेणी तसेच उपविभगीय अभियंत्यांना ई-३ प्रमाणे वेतनश्रेणी द्यावी ही अधिकाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. बीएसएनएलमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांना इतर शासकीय कंपन्याप्रमाणे कालबध्द पदोन्नती द्यावी, कालबध्द पदोन्नतीचा कार्यकाळ ४ वर्षांचा असावा, अधिकाऱ्यांचा वेतनातील तफावत त्वरित दूर करावी. स्थापत्य व विद्युत अभियंत्याना इतर अधिकाऱ्याप्रमाणे पदोन्नती द्यावी तसेच त्यांचे प्रलंबीत प्रश्न त्वरित निकाली काढावे, आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामध्ये सतीश काळमेघ, संतोष गांधी, देवनाथ भड, प्रफुल्ल कांडलकर, मनीष माहुरे, नीलेश जिचकार, गजानन शेरेकर, देवीदास पोटे, संजय ढोक, हरीष बागडे, महेंद्र कराळे, ओंकार सोरते, विकास नागठाणे सहभागी होते.