शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पीआरसी संभाव्य दौऱ्यात ब्रॉडबँड सेवेचा खोडा

By admin | Updated: September 20, 2015 00:41 IST

विधिमंडळ सचिवालयाच्या पंचायत राज समितीचा संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर प्रशाकसीय कामकाजात बीएसएनएलच्या ब्रॉड बँड सेवेचा खोडा ...

फटका : प्रशासकीय कामकाज प्रभावितअमरावती : विधिमंडळ सचिवालयाच्या पंचायत राज समितीचा संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर प्रशाकसीय कामकाजात बीएसएनएलच्या ब्रॉड बँड सेवेचा खोडा आल्याने प्रशासकीय कामकाज संकटात सापडले आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सतत भारत दूरसंचार निगमकडे कितीही पाठपुरावा करीत असले तरी या विभागाकडून असहकार्य मिळत असल्याने मिनीमंत्रालतील प्रशासकीय कामकाज सांभाळणारी यंत्रणा चांगलीच हतबल झाली आहे.विधानमंडळाची पंचायत राज समिती सन २००८/२००९ मध्ये अमरावती जिल्ह्याचे दौऱ्यावर आली होती. यादरम्यान सन २०११/ २०१२ चे लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन २०१२/१३ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्यासंदर्भात जिल्हा परिषदेला भेट दिली असता त्यावेळी सीईओ यांची साक्ष येत्या आॅक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. वरील विषयाची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून येत्या ३० सष्टेंबरपर्यंत विधिमंडळ सचिवालयाने मागविली आहे. त्यामुळे मिनीमंत्रालयाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यात सत्ताबदल होताच विधानमंडळाच्या पंचायतराज समिती गठित केली आहे. यामध्ये एकूण १५ आमदारांचा समावेश आहे. विधानमंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा म्हटला की प्रशासनात याची सर्वाधिक दखल घेतली जाते. या समितीच्या संभाव्य दौऱ्याचे प्रार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेतील प्रशासकीय यंत्रणेत लगबग सुरू झाली आहे. .त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाने याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमार्फत आवश्यक माहिती मागविण्यात आली असून प्राप्त झालेली माहिती 'अपडेट' करण्याची प्रक्रिया जिल्हापातळीवर सुरू झाली असतानाच हे महत्त्वाचे कामकाज प्रशासकीय संगणकावर करण्यासाठी व 'अपडेट' माहितीचे ई-मेल तसेच शासनाकडून येणारे महत्त्वाचे मेल हे मागील आठ दिवसांपासून केवळ भारत दूरसंचार निगमच्या असहकाऱ्यामुळे रखडून पडले आहेत. जिल्हा परिषदेतील ब्रॉड बँड सेवा ठप्प पडल्याने यासर्व गोष्टींचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर पडला असून पीआरसीच्या संभाव्य दौऱ्यात याची आडकाठी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजात होत आहे.