थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:03+5:302021-03-04T04:22:03+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तुकाराम टेकाळे हे रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार महिला व ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तुकाराम टेकाळे हे रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार महिला व बाल कल्याण विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांच्याकडे होता. तेही वैद्यकीय रजेवर असल्याने अतिरिक्त प्रभार तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.

..........................................

तेजराव काळे यांनी पदभार स्वीकारला

अमरावती: जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी वामन बोलके हे सेवानिवृत्त झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचा प्रभार सहायक संचालक तेजराव काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

.........................................

कठोरा नाका ते हर्षराज रस्ता उखडला

अमरावती : कठोरा नाका ते हर्षराज रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

..............................

Web Title: Brief news