शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वीर हवेत, तर वीरमाताही हव्यात !

By admin | Updated: May 10, 2015 00:40 IST

‘बालसंगोपन हे महिलांचे महान राष्ट्रकार्य’ असे समजून चालले तरी, या मातांना जर वीरवृत्तीचा, राष्ट्रीय भावनेचा ...

अमरावती : ‘बालसंगोपन हे महिलांचे महान राष्ट्रकार्य’ असे समजून चालले तरी, या मातांना जर वीरवृत्तीचा, राष्ट्रीय भावनेचा किंवा समाजसेवोच्या तत्परतेचा स्पर्श झालेला नसेल, त्यांच्यात हे संस्कार बाणलेले नसतील, तर आपल्या बालगोपालांत त्यांची पेरणी त्या करू शकणार नाहीत. मातेच्या दुधातून ते अमृताचे घोट त्यांना मिळाल्याशिवाय राष्ट्रात ती तेजस्वीता कायम राहणार नाही. तिच्यात अंशत: का होईना, असे संस्कार आल्याशिवाय तिच्या जन्माला येणाऱ्या सुपुत्रात त्यांचा पुरेपूर विकास होणे शक्य नाही. जगाच्या इतिहासावर दृष्टी टाकल्यास आपणास दिसून येईल की, जे पुरुष वीर, संत, मुत्सद्दी, समाजधुरीण किंवा श्रेष्ठ म्हणून गाजले आहेत, त्यांच्या मातांमध्ये ते गुण, बीजरुपाने वसत होते. वीरप्रसू वीरमाता ह्या अत्यंत तपस्वीनी व प्रतिकारासाठी सज्ज अशा रणचंडिका होत्या. वीर भरताची माता शकुंतला आणि छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जीजाबाई इत्यादीकांच्या उदाहरणावरुन हे सहज कळून येईल. तशी कितीतरी उदाहरणे आमच्या भरतवर्षातीलच देता येण्यासारखी आहेत, अर्थात् राष्ट्रात महापुरुष निर्माण होण्यासाठी ‘पहिले तो करी देवकी जैसी माताएँ जगमे पैदा’ यांची जोड करुन देणे हे तितकेच आवश्यक आहे. ‘तुम्ही आपले घर सांभाळा म्हणजे झाले’ एवढेच स्त्रियांना शिकवून भागणार नाही. घर आणि राष्ट्र यांचा अविभाज्य संबंध लक्षात घेऊन आपणास घरातूनच सर्व गोष्टींना आरंभ केला पाहिजे. तुळशीसमोर रांगोळी घालताना चक्र काढूनच भागणार नाही तर त्यांना चक्राचा प्रत्यक्ष व्यवहारी उपयोग करण्याचे शिक्षण मिळाले पाहिजे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक विषयांवर मतप्रदर्शन केले आहे. स्त्रीचे घरातील-समाजातील स्थान आणि विशेष म्हणजे माता या नात्याने स्त्रीचे कर्तव्य याबाबतही श्री गुरुदेवांनी परिणामकारक विचार व्यक्त केले आहेत. श्रीगुरुदेव या मासिकामध्ये सन १९४७ च्या एप्रिल महिन्यात राष्ट्रसंतांचे प्रसिद्ध झालेले विचार जागतिक मातृत्त्वदिनाच्या निमित्ताने खास 'लोकमत'च्या वाचकांसाठी येथे देत आहोत...