शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

बोंडसडमुळे 2.17 लाख हेक्टरवरील कपाशी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सार्वत्रिक  बोंडसड अन्   बोंडअळीमुळे नुकसान झालेले आहे. यात बोंडसड ही दोन प्रकारची आहे. यामध्ये बोंडाच्या पृष्ठभागावर होणाऱ्या संसर्गाला काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषावर जगणारे सूक्ष्मजीव, तसेच काही प्रमाणात बोंडावरील करपा जिवाणू कारणीभूत ठरतात. बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत हे प्रकार घडतात. बहुतेक वेळा बोंडावरच बुरशीची वाढ दिसून येते. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस याला कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देसततच्या पावसाने बुरशीजन्य रोग, गुलाबी बोंडअळी

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीपेक्षाही सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगासह झालेल्या बोंडसडने २.१७ लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक बाधित झाले आहे. एकूण क्षेत्राच्या ८९ टक्के क्षेत्रात हे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे.जिल्ह्यात सार्वत्रिक  बोंडसड अन्   बोंडअळीमुळे नुकसान झालेले आहे. यात बोंडसड ही दोन प्रकारची आहे. यामध्ये बोंडाच्या पृष्ठभागावर होणाऱ्या संसर्गाला काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषावर जगणारे सूक्ष्मजीव, तसेच काही प्रमाणात बोंडावरील करपा जिवाणू कारणीभूत ठरतात. बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत हे प्रकार घडतात. बहुतेक वेळा बोंडावरच बुरशीची वाढ दिसून येते. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस याला कारणीभूत ठरत आहे. याशिवाय कमी  प्राणवायू अवस्थेत तग धरणारे जिवाणू आणि काही प्रमाणात आंतर वनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे रोग होतो, कपाशीची बोंडे बाहेरून अगदी निरोगी दिसतात. मात्र, फोडली असता, आतील कापूस पिवळसर  गुलाबी, लाल रंगाची होऊन सडल्याचे दिसून येते. कपाशीची रुईदेखील सडल्याचे आढळते. जिल्ह्यातील कपाशी क्षेत्राचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केल्यानंतर नुकसानाची तीव्रता स्पष्टपणे जाणवत आहे. 

तालुकानिहाय नुकसानजिल्ह्यात कपाशीचे २.४४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात अमरावती तालुक्यात १५,९९९, भातकुली ४,०५०, चांदूर रेल्वे ६,२८०, धामणगाव रेल्वे १६,८१०, नांदगाव खंडेश्वर ६,५००, अचलपूर १४,५००, अंजनगाव सुर्जी १७,५३८, दर्यापूर ३६,७०१, धारणी ९०, चिखलदरा १८,५९, मोर्शी २९,८२६, वरूड २९,८९१, तिवसा १०,००० व चांदूर बाजार तालुक्यात १६,९५७ हेक्टरमध्ये बोंडसड व गुलाबी बोंडअळी यामुळे कपाशीचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती