राष्ट्रीय महामार्गालगत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST2021-05-31T04:10:50+5:302021-05-31T04:10:50+5:30

बडनेरा : राष्ट्रीय महामार्गालगत २० वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी बडनेरा पोलिसांना आढळून आला. त्याच्या छातीवर व पोटावर ...

Bodies found near national highway | राष्ट्रीय महामार्गालगत आढळला मृतदेह

राष्ट्रीय महामार्गालगत आढळला मृतदेह

बडनेरा : राष्ट्रीय महामार्गालगत २० वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी बडनेरा पोलिसांना आढळून आला. त्याच्या छातीवर व पोटावर शस्त्राचे अनेक वार होते. चेहरा जळालेल्या अवस्थेत होता. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बच्चू ऊर्फ रोहन किसनराव वानखडे असे मृताचे नाव सांगण्यात आले. तो अमरावतीच्या बेलपुरा परिसरातील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बडनेरा पोलिसांना राष्ट्रीय महामार्गावरील चक्रधर पेट्रोल पंपानजीक रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावरील झुडपात आढळून आला. सदर मृत व्यक्ती हरविल्याची तक्रार शनिवार, २९ मे रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यामुळे पोलीस त्याच्या शोधातच होते. बडनेरा पोलिसांना महामार्गालगत मृतदेह असल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्याच्या छातीवर व पोटावर शस्त्राने मारल्याच्या अनेक खुणा दिसून आल्या. शरीराचा वरील भाग जळालेल्या स्थितीत होता.

पोलीस निरीक्षक बबन पुसाटे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकदेखील बोलाविण्यात आले होते. मृताच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक माहितीच्या आधारावर अकोला मार्गाकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

Web Title: Bodies found near national highway