मंडळ अधिकारी, तलाठ्यासह दलाल एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: August 11, 2015 00:14 IST2015-08-11T00:14:07+5:302015-08-11T00:14:07+5:30

संपत्तीच्या वाटणीपत्राचे फेरफार करण्यासाठी १८ हजारांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठ्यासह एका दलालाला ...

Board officials, brokers and brokers with ACB | मंडळ अधिकारी, तलाठ्यासह दलाल एसीबीच्या जाळ्यात

मंडळ अधिकारी, तलाठ्यासह दलाल एसीबीच्या जाळ्यात

१८ हजारांची मागितली लाच : तिवसा तहसील परिसरातील घटना
तिवसा : संपत्तीच्या वाटणीपत्राचे फेरफार करण्यासाठी १८ हजारांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठ्यासह एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सकाळी तिवसा तहसील कार्यालयातून ताब्यात घेतले.
कुऱ्हा येथील मंडळ अधिकारी सुभाष पुंडलिक खाकसे (५४), गव्हाबाळापूर येथील तलाठी संजय ओंकार सांगळुदकर (४८) व दलाल रमेश रघुनाथ भक्ते (४३,रा.कुऱ्हा) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. कुऱ्हा येथील रहिवासी विनोद रणजितसिंग बंगरे (३२) यांच्या वडिलांच्या मालकीच्या संपत्तीची आई व भांवडांमध्ये वाटणी करायची होती. वाटणीपत्राच्या फेरफारासाठी विनोद बंगरे तिवसा तहसील कार्यालयात गेले होते. तेथे दलाल रमेश रघुनाथ भक्ते, मंडळ अधिकारी सुभाष खाकसे व तलाठी संजय सांगळुदकर यांनी संगनमत करून विनोदला फेरफार करून देण्यासाठी १८ हजारांची लाच मागितली.
विनोद बंगरे यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी महिनाभर आरोपींची माहिती गोळा करून बंगरे यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर सोमवारी सकाळी एसीबीचे पोलीस निरीक्षक बी.एन.उराळे, आर.आर.शीरे यांच्या नेत्तृत्वात सहायक पोलीस निरीक्षक कैलास सानप, पोलीस शिपाई एस.सी.बारड, विनोद दाभने, पी.सी.धानोकर व श्रीकृष्ण तालन यांनी दोन पथके तयार केलीत.

Web Title: Board officials, brokers and brokers with ACB