शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या १५४.९० कोटींच्या अर्थसंकल्पावर मोहोर

By admin | Updated: March 31, 2017 00:15 IST

जुन्या, नवीन कायद्याची सांगड घालीत अमरावती विद्यापीठाने सन २०१७-२०१८ या वर्षातील १५४.९० कोटींचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला.

विद्यार्थीभिमुख योजनांना प्राधान्य : ५४.६९ कोटींंची तूट अपेक्षितअमरावती : जुन्या, नवीन कायद्याची सांगड घालीत अमरावती विद्यापीठाने सन २०१७-२०१८ या वर्षातील १५४.९० कोटींचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला. कुलगुरू चांदेकर यांच्या संकल्पनेतील विद्यार्थीभिमुख योजनांना बजेटमध्ये स्थान मिळाले आहे. अंदाजित प्राप्ती आणि खर्चाचा ताळमेळ बसवून ५४.६९ कोटी तुटीच्या बजेटवर मोहोर उमटवली.अध्यक्षस्थानी कुलगुरू चांदेकर होते तर कुलसचिव अजय देशमुख यांनी कामकाजात सहभाग घेतला. लेखा व वित्त अधिकारी तथा व्यवस्थापन परिषद सदस्य शशीकांत अस्वले यांनी सन २०१६-१७ चा सुधारित तर सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी व्यवस्थापन परिषद सदस्य एफ.सी. रघुवंशी यांनी अनुपालन अहवालावर बोट ठेवले. साहित्य खरेदी करून ते वापरात येत नसेल तर कशाला खरेदी करता, असा सवाल रघुवंशी यांनी केला. जलतरण तलावाच्या देखभालीवर उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल तर ते खासगी तत्त्वावर का दिले जात नाही, असेही ते म्हणाले. "अ‍ॅफिलेशन" महाविद्यांलयांकडे थकीत शुल्क, कॅन्टीनचे लीजधोरण, टेली सॉफ्टवेअर खरेदीचा मुद्दा उपस्थित करून रघुवंशी यांनी सभेचे लक्ष वेधले. यावेळी कुलगुरूंनी रघुवंशी यांच्या सूचनांचे पालन करून बजेटमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. वाशीम येथे विद्यापीठ उपकेंद्र निर्मितीबाबत चर्चा झाली. विद्यापीठात चार पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत मंथन झाले. वार्षिक अहवालाचे वाचन मराठी विभागप्रमुख मनोज तायडे यांनी केले. यावेळी जयंत वडते, अविनाश असनारे, चौबे, श्रीकांत पाटील, अजय देशमुख आदींनी काही निधीच्या तरतुदीविषयी मत मांडले. परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प, योजना किंवा सहयोय कार्यक्रम अनुदान या तीन भागांमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ठळक वैशिष्ट्येस्वच्छ भारत- स्वस्थ भारत उपक्रम, बेस्ट प्रॅक्टीसेस इन युनिव्हर्सिटींतर्गत विविध कार्यक्रम, परीक्षा सुधारणा अंतर्गत जुन्या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यासाठी ई-गव्हर्नन्स, विद्यार्थी सुरक्षा विमा, संशोधक तसेच विद्यार्थ्यांना अत्यावश्यक गं्रथालयीन सुविधा, बुलडाणा येथे आदर्श पदवी महाविद्यालय, संत गाडगेबाबा विद्याधन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, आपत्कालीन निधीतून विविध उपक्रम व शिबिर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा बस पास, संत गाडगेबाबा शिक्षण संरक्षण योजना, संत गाडगेबाबा शुद्ध पेयजल योजना, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अपारंपरिक ऊर्जा व जलस्त्रोत निर्मिती ही वैशिष्ट्ये होत.विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून तसेच परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या अनुषंगाने बजेटमध्ये योजना, उपक्रमांना स्थान देण्यात आले आहे. तुटीचा अर्थसंकल्प असला तरी येत्या काळात केंद्र व राज्य शासनाकडून निधी, अनुदानाची मागणी करुन ही तूट भरून काढू. विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार कामकाज केले जाईल. - मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, अमरावती विद्यापीठ