भाजपने अमरावतीतील वातावरण बिघडवू नये - ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:06 IST2021-11-22T11:04:54+5:302021-11-22T11:06:39+5:30
मुंबई : अमरावती येथील वातावरण बिघडवण्याचा भाजपने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि ...

भाजपने अमरावतीतील वातावरण बिघडवू नये - ठाकूर
मुंबई : अमरावती येथील वातावरण बिघडवण्याचा भाजपने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडले तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचे राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया महिला व बाल कल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
ॲड. ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे, ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याला शांतता हवी, हेच यातून दिसते. हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत, मात्र त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचे वातावरण बिघडवायचे आहे, असे दिसत आहे. रझा अकादमीचे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत गृहविभाग कारवाई करत आहे, असेही त्या म्हणाल्या.