शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीर अण्णाभाऊंचे जीवनचरित्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या लढ्याला यश, शिष्टमंडळाने घेतली कुलगुरुंची भेट अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लोकशाहीर ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या लढ्याला यश, शिष्टमंडळाने घेतली कुलगुरुंची भेट

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट केले जाणार आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी याविषयी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाला शनिवारी माहिती दिली. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने २९ जुलै २०२० रोजी बैठकीद्धारे अमरावती विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट करण्यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन सादर केले होते. सिनेट सदस्य मनीष गवई यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी पत्रव्यवहार केला. अण्णाभाऊंचे जीवनचरित्र अभ्यासक्रमात समावेश करण्यात आले नाही तर आंबेडकरी जनता तीव्र आंदोलन करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हा विषय मराठी अभ्यास मंडळाच्या सभेसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी उशिरा का होईना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊंचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. कुलगुरू चांदेकर यांनी घेतलेल्या भूमिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने स्वागत केले. त्यांचा सत्कारदेखील केला.

यावेळी समाधान वानखडे, दादासाहेब क्षीरसागर, गजानन वानखडे, महादेवराव खंडारे, मनीष गवई, भूषण बनसोड, सुरेश दहिकर, उत्तमराव भैसने, अरूण वानखडे, राजाभाऊ हातागडे, बी.टी. अंभोरे आदी उपस्थित होते.

-----------------------------------

(सारांश वृत्त)

अे.बी. अंभोरे यांची नियुक्ती

फोटो २७एएमपीच१६

अमरावती : येथील अे.बी. अंभोरे यांची राज्य शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. या समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असून, उपाध्यक्ष याच विभागाचे राज्यमंत्री आहेत. समितीचे निमंत्रक उच्च शिक्षण संचालक आहे. अे. बी. अंभोरे हे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राचे गाढे अभ्यासक आहे.