शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

मालूरच्या पुनर्वसनात कोट्यवधीची अवैध वृक्षतोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

फोटो - कडू २९ एस गावकऱ्यांची आर्जव व्हायरल, मंत्रालयात पोहोचली तक्रार अनिल कडू परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल ...

फोटो - कडू २९ एस

गावकऱ्यांची आर्जव व्हायरल, मंत्रालयात पोहोचली तक्रार

अनिल कडू

परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील मालूर फॉरेस्ट गावाच्या पुनर्वसनादरम्यान, पुनर्वसित होऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांकडून कोट्यवधी रुपये किमतीच्या सागवान लाकडाची अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत वृक्षतोड केली जात असून, ती लाकडे वाहनामध्ये भरून मेळघाट बाहेर आदिवासी नेत आहेत. या अनुषंगाने मालूर ग्रामस्थांनीच एक तक्रार २७ जानेवारीला राज्याच्या वन मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे पाठविली आहे. या तक्रारीवर एकूण १३८ लोकांनी नावापुढे अंगठ्याचे ठसे वा स्वाक्षरी दिली आहे.

प्रकल्प अधिकार्‍यांपासून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त आणि खोज या संस्थेकडे तक्रार करण्यात आली. खोजने तक्रार ई-मेलवरून २८ जानेवारी रोजी सर्वदूर पाठविली आहे. या तक्रारीसोबत वृक्षतोडीचे छायाचित्रही समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. अवैध वृक्षतोडीचे हे कोट्यवधीचे सागवान हरिसाल-सेमाडोह नाक्यावरून खुलेआम ट्रकमधूनच पाठविले जात आहे. या लाकडाची कुठेही तपासणी होत नाही. वनअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे

---------

मालूर फॉरेस्टचे पुनर्वसन सुरू आहे. गावातील ३१० कुटुंबांपैकी १२५ कुटुंबांचे पुनर्वसन झालेले आहे. यातील काही चांदुर बाजार तालुक्यातील काटपूर व बहीरम परिसरात वास्तव्यास गेले आहेत. पुनर्वसित कुटुंबांकडून अशा प्रकारची कुठलीही अवैध वृक्षतोड केली गेलेली नाही. आर.के. पटवारी, सहायक वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग