उभ्या टिप्परवर धडकली दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:29 IST2020-12-14T04:29:41+5:302020-12-14T04:29:41+5:30

दर्यापूर : भरधाव दुचाकी उभ्या टिप्परवर धडकून दुचाकीस्वार ठार झाला. मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ...

The bike hit the vertical tipper | उभ्या टिप्परवर धडकली दुचाकी

उभ्या टिप्परवर धडकली दुचाकी

दर्यापूर : भरधाव दुचाकी उभ्या टिप्परवर धडकून दुचाकीस्वार ठार झाला. मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास खल्लार अजितपूर ते बोराळा मार्गावरील शिंगाडी नाल्याच्या पुलावर हा अपघात घडला. विकी आठवले (२४) असे मृताचे, तर अंकुश खडसे (१८, दोघेही रा.दारापूर) असे जखमीचे नाव आहे.

शनिवारी रात्री ९ च्या सुमारास दोघेही दर्यापूरहून दारापूरकडे जात होते. अजितपूर ते बोराळा फाट्यानजीक शिंगाडी नाल्याच्या पुलावर उभ्या असलेल्या आरजे २७ जीसी ६३२५ या टिप्परवर दुचाकी धडकली. या धडकेत विकी आठवले हा जागीच ठार झाला, तर अंकुश खडसे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनात दिपेश चंदेल, रामेश्वर नागरे, चालक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अंकुश खडसे याला पुढील उपचारार्थ अमरावतीला पाठविण्यात आले.

Web Title: The bike hit the vertical tipper