शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! जंगलात पार्ट्या कराल तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:29 IST

वडाळी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात पार्ट्या कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार आहे. जंगलात मानवी हस्तक्षेप पर्यावरण दूषित करणाऱ्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जंगलात ओली पार्टी करणाऱ्या उपद्रवींवर अंकुश लावण्यासाठी अमरावती वनविभागाने जंगल परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना इशारा दिला आहे.

ठळक मुद्देकायदेशीर कारवाईचे झळकले फलक

अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात पार्ट्या कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार आहे. जंगलात मानवी हस्तक्षेप पर्यावरण दूषित करणाऱ्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जंगलात ओली पार्टी करणाऱ्या उपद्रवींवर अंकुश लावण्यासाठी अमरावती वनविभागाने जंगल परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना इशारा दिला आहे.वडाळी वनपरिक्षेत्राचा दर्जा राखीव वनात असून, हे जंगल वन्यजीवाचे आश्रयस्थान आहे. या जंगलात बिबट, रानडुक्कर, नीलगाय, चितळ, मोर आदी वन्यजीवांसह जंगलाचा राजा वाघसुद्धा आढळून आला आहे. त्यामुळे जंगलात मानवी हस्तक्षेप धोकादायक ठरू शकते. मानव व वन्यप्राणी संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत वडाळी वनपरिक्षेत्रात छत्री तलाव मार्गावरील जंगलात मद्यपी पार्ट्या करताना आढळले. पार्ट्या करणारे जंगलात कचरा व घाण करून ठेवत असल्यामुळे वन्यजीवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जंगलातील काही ठिकाणी मद्याच्या बॉटल्स व पाणी पाऊच आढळल्याचे काही प्रकार पुढे आले. याविषयी गंभीर दखल घेत उपवनसरंक्षक गजेन्द्र नरवणे यांनी घेतली. विनापरवानगी जंगलात जाल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.- तर होईल दखलपात्र वनगुन्हाविनापरवानगी जंगलात फिरायला जाणे, पार्टी करणे, आगी लावणे, धूम्रपान अथवा मद्यपान करणे, वृक्षतोड करणे, वन्यजीवाला त्रास व ईजा होईल, असे कोणतेही कृत्य दखलपात्र वनगुन्हा ठरते. जर वनविभागाने दिलेल्या सूचनांचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ चे विविध कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.छत्री तलाव मार्गालगतच्या जंगलात मद्यपींच्या पार्ट्या चालत असल्याचा प्रकार तेथील मद्याच्या बॉटलवरून लक्षात येत आहे. जंगलात पार्ट्या करणे गुन्हा ठरतो. त्याचा परिणाम वन्यजीवांवर होतो. त्यामुळे सूचना फलक लावून कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहे.- गजेंद्र नरवणे, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग