शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी बेनोडावासीयांची ग्रा.पं.वर धडक

By admin | Updated: February 26, 2016 00:30 IST

ग्रामपंचायतींतर्गत ग्रामस्थांना ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होत होता ते जलस्त्रोत आटल्याने आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

रोष उफाळला : आठवड्यानंतर मिळतेय पाणी, १६ गाव पाणीपुरवठा योजना कुचकामीवरूड/बेनोडा (शहीद) : ग्रामपंचायतींतर्गत ग्रामस्थांना ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होत होता ते जलस्त्रोत आटल्याने आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लोणी जरुड १६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. थकीत वीज देयकांमुळे सदर योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते. फेब्रुवारी महिन्यातच बेनोडावासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने असंतुष्ट नागरिकांनी बुधवारी ग्रामपंचायतीवर धडक देऊन रोष व्यक्त केला. १० ते १२ हजार लोकवस्तीचे बेनोडा गाव. शेतकरी, शेतमजुरांची येथे अधिक संख्या आहे. या गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याकरिता पाणीपुरवठा करणारे तीन पंप हाऊस तर दोन ग्रामपंचायतींच्या मालकीचे बोअर आहेत. १ हजार १४८ नळधारक आहेत. मात्र भूजल पातळी प्रचंड खालावल्याने दोन बोअर आणि तीन विहीरी आटल्या आहेत. यामुळे ेगावपात आतापासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन नागरिकांमध्ये असंतोष खदखदत असल्याने ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या खासगी बोअरवरुन पाणीपुरवठा जोडून सात दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एका माणसाला साधारणत: ४० लिटर पाणी आवश्यक असल्याने आवश्यकतेनुसार पाणी मिळत नाही. पाण्यासाठी बेनोडावासीयांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकरी, शेतमजुरांची ससेहोलपट सुरू झाली आहे. पाण्याच्या टंचाईला कंटाळलेल्या शेकडोे महिलांसह अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेऊन तीव्र असंतोष व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कांबळे तसेच ग्रमपंचायत कर्मचारी उपस्थित होते. मोर्चेकरी ‘पाणी द्या हो पाणी द्या, नाही तर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा देत होते. (तालुका प्रतिनिधी)