शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ

By admin | Updated: June 25, 2015 00:09 IST

शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट....

अपडेट माहिती : कृषी विभाग करणार दररोज मार्गदर्शनधामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट कृषी विभागासमोर असून पुढच्या सात दिवसांत या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर कृषी सहायकांना घ्यावे लागणार आहेत.शेतकऱ्यांना शेती संदर्भात वेळोवेळी माहिती उपलब्ध व्हावी, दरवर्षी शेतात होणाऱ्या उत्पन्नात भर पडावी, कोणते बियाणे शेतात पेरावे, किती दिवसानंतर खते द्यावीत कीड संरक्षणाचा उपाय याविषयीची माहिती आता शेतकऱ्यांना दररोज मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुढाकार घेतला आहे़ त्या संदर्भात कृृषी विभागाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या उपविभागात कृषी सहायकांची बैठक घेऊन किसान एसएमएस योजनेकरिता शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेण्याचे आदेश दिले आहेत. यात शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, घेत असलेली पिके अशी विविध माहिती अर्जामध्ये नमूद क रून कृषी विभागाला सादर करावयाची आहे़ विशेषत: शेतकऱ्यांना शेती संदर्भात एखादी माहिती गरजेची असल्यास कृषी विभागाचा ‘व्हॉटस् अ‍ॅप’ नंबरही राहणार आहे़ याद्वारे शेतकऱ्यांना त्वरित सर्व माहिती मिळणार आहे़ ३० जूनपर्यंत दीड लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅन लाईन करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना शेतीची दररोज माहिती मिळावी या उद्देशाने ‘किसान एसएमएस’ योजनेसाठी शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅनलाईन करावयाचा आहे़ याविषयी कृषी सहायक ांची बैठक घेऊन निर्देश दिले आहेत़ -अनिल खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारीप्रत्येक शेतकऱ्याची माहिती अपडेट करणे सुरू असून शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक कृषी सहायकाकडे देऊन ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ घ्यावा-गोरख वावरे, अध्यक्ष, कृषी सहायक संघटना