शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाचा विकास मंदावला

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळ विकासाच्या हालचाली मंदावल्या आहेत.

अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळ विकासाच्या हालचाली मंदावल्या आहेत. शासन, प्रशासन स्तरावर विमानतळाच्या फाईलवर धूळ साचली असल्याने खरचं विमानतळाचा विकास होईल काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेलोरा विमानतळाच्या विकास होणार. त्याकरिता निधी कमू पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. बेलोरा विमानतळाहून प्रवासी सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतरही विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. एकीकडे विमानतळाचा विकास, विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी जागा ताब्यात घेतल्यानंतरही विमानतळाचा विकास होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीची नाराजी पाहावयास मिळत आहे. जिल्हा विकासापासून माघारला असताना विमानतळाचा विकास झाल्यानंतर नवे उद्योगधंदे उभारुन काहीतरी रोजगाराचा वाटा उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, विमानतळाचा विकास आणि विस्तार हे कागदावरच आहे. त्यामुळे जमिनींचे अधिग्रहण कोणासाठी असा सवाल विचारला जात आहे. आघाडी शासन जावून युती शासन सत्तेवर आल्यानंतर बेलोरा विमानतळाच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु नव्या शासनाकडून काहीही हालचाली होत नसल्याची माहिती आहे. विमानतळाच्या विकासात आडकाठी ठरणाऱ्या यवतमाळ - अकोला या चार कि. मी. वळण मार्गाच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असताना अद्यापपर्यंत हा रस्ता निर्माण करण्यात आला नाही. यापूर्वी विमानतळाची ७४ हेक्टर जमीन होती. परंतु नव्याने ३०० हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणात नव्याने टॉवर, रन-वे, प्रशासकीय इमारत आदी बाबींचा समावेश आहे. निधी उपलब्ध नसल्याने विकास कामांना सुरुवात करणे अशक्य असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)विमानतळाचा विकास व विस्तारीकरणाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. शासनाकडे आराखडा पाठविण्यात आला आहे. विमान प्राधिकरणाच्या चमूने पाहणी देखील केली आहे. परंतु निधी अभावी विकास कामे करता येत नाही.-एम.पी. पाठक, प्रबंधक, बेलोरा विमानतळ