शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
4
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
5
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
6
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
7
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
8
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
9
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
10
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
11
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
12
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
13
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
14
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
15
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
16
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
17
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
18
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
19
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
20
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
Daily Top 2Weekly Top 5

बिबामल येथे विवाहितेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

------- सावळी येथे वीज तंत्रज्ञाला शिवीगाळ ब्राह्मणवाडा थडी : नजीकच्या सावळी खुर्द येथे वीज तंत्रज्ञाला बिल भरत असल्याचे सांगून ...

-------

सावळी येथे वीज तंत्रज्ञाला शिवीगाळ

ब्राह्मणवाडा थडी : नजीकच्या सावळी खुर्द येथे वीज तंत्रज्ञाला बिल भरत असल्याचे सांगून बोलावल्यानंतर शिवीगाळ करण्यात आली. कॉलर पकडली तसेच काठी उगारण्यात आली. याप्रकरणी आसेगावपूर्णा पोलिसांनी भादंविचे कलम ३५३, २९४ अन्वये बाबूराव गुलाबराव तायडे (४०) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. तंत्रज्ञ प्रवीण छापाने (२९) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

------

मंगरूळ चव्हाळा येथे घरफोडी

मंगरूळ चव्हाळा : वाढोणा रामनाथ येथे राहुल पांडुरंग आखरे (३१) यांच्या घरी २ मार्च रोजी चोरी झाली. ते गोलवाडी (जि. वाशीम) येथे नातेवाइकाकडे लग्नाला गेले होते. चोरट्यांनी कपाटातील १२.५ ग्रॅमचा नेकलेस, आठ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, चार ग्रॅमची कर्णफुले, गहू विक्रीतून मिळालेले रोख ४५ हजार रुपये चोरून नेले. मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------

लाल्याचे पैसे देत नसल्याने भावाला मारहाण

मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या बोरगाव धांदे येथील अविनाश विंचूरकर (३५) यांनी वडिलोपार्जित जमिनीवरील पिकाच्या लाल्याच्या नुकसानभरपाईसाठी मिळालेले पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून भाऊ प्रवीण (४०) व त्याचा मुलगा प्रीतम (२५) यांनी अनुक्रमे काठी व कुऱ्हाडीने मारले. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ४४७, ३४ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------

फुबगाव येथे महिलेला मारहाण

बेलोरा : चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव येथे ४५ वर्षीय महिलेला सागर जयकिसन गवई, अक्षय मनोहरे व दोन महिलांनी मारहाण केली. बकरीचे खत अंगणात का सांडवले, असे म्हटल्यावरून मारहाण करण्यात आली.

------------

रेतीची चोरटी वाहतूक पकडली

चांदूर बाजार : तालुक्यातील फुबगाव ते चांदूर बाजार मार्गावर रेतीची चोरटी वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. पोलिसांनी याप्रकरणी चालक नितीन ज्ञानेश्वर किटुकले (२७, रा. फुबगाव) याच्याविरुद्ध २ मार्च रोजी गुन्हा नोंदविला.

------------

चिंचोली येथे महिलेला मारहाण

शेंदूरजनाघाट : ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली येथे २८ वर्षीय महिलेला २ मार्च रोजी सकाळी कमलकिशोर रामदास काळे (३५) व त्याच्या पत्नीने शिवीगाळ केली व मारहाण केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------

ब्राह्मणवाडा थडी येथे महिलेचा विनयभंग

ब्राह्मणवाडा थडी : स्थानिक २२ वर्षीय विवाहितेचे खुल्या जागेत बांधण्यात येत असलेल्या घराची भिंत केतन लाड (३२) व अविनाश बदुकले हे पाडत होते. तिने हटकल्यावर अविनाशने डोक्याचे केस पकडून विनयभंग केला. याप्रकरणी ब्राह्मणवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३५४ (अ), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.