शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! भेसळयुक्त मिठाई बाजारात

By admin | Updated: October 1, 2015 00:19 IST

गणेशोत्सव नुकताच आटोपला आहे तर नवरात्रोत्सव आणि दिवाळी- दसऱ्याचे वेध अंबानगरीला लागले आहेत.

एफडीएची करडी नजर : सण-उत्सवात लाखोंची उलाढालसंदीप मानकर अमरावतीगणेशोत्सव नुकताच आटोपला आहे तर नवरात्रोत्सव आणि दिवाळी- दसऱ्याचे वेध अंबानगरीला लागले आहेत. सणासुदी दरम्यान मिठाई, दुग्धजन्य पदार्थांची मोठी उलाढाल असते. ग्रामीण भागातही मिठाईला मोठा उठाव असतो. या पार्श्वभूमिवर मिठाई उत्पादक व विक्रेते मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. यंदाही हा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा भेसळयुक्त पदार्थांवर आता ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. अन्न व सुरक्षा मानके कायद्यांतर्गत खाद्यपदार्थात भेसळ करणे, निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री करणे हा गुन्हा आहे. परंतु खव्यात रवा मिसळणे, साखर मिश्रित खव्याची विक्री, खव्यात स्टार्च पावडर मिसळणे, असे प्रकार घडण्याची शक्यता असते. तसे प्रकार अनेकदा उघडकीसही आले आहेत. ही भेसळ आरोग्याला धोकादायक असते. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत ही भेसळ ओळखण्याच्या क्लृप्त्या नागरिकांनी शिकून घेतल्यास भेसळयुक्त पदार्थांपासून बचाव करता येणे शक्य आहे. अशी ओळखा खव्यातील भेसळ खव्यातील भेसळ घरच्या घरी ओळखण्याकरिता खव्यामध्ये आयोडीनयुक्त रसायन मिसळता येईल. खव्यात स्टार्च मिसळले असेल तर आयोडीन व स्टार्चच्या संयोगातून निळा रंग येतो. चमचाभर खवा घेऊन अशी प्रक्रिया केल्यास घरच्या घरी भेसळयुक्त खवा ओळखता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डालडा, बेसन, दूध आणि इतर खाद्यपदार्थांवरही अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांची नजर आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकून नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील, असे सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अ‍ॅल्युमिनिअम कॉईल आरोग्यास हानिकारकमिठाईमध्ये अखाद्य रंगांचा उपयोग करण्यावर बंदी आहे. परंतु मिठाईची उत्कृष्ट सजावट करण्याकरिता विक्रेते या रंगांचा सर्रास उपयोग करतात. मिठाईवर ‘सिल्व्हर कोटींग’ करताना अ‍ॅल्युमिनिअम (चमकीचा कागद) कॉईल वापरले जाते. तो आरोग्यासाठी घातक आहे. दुधातही होऊ शकते भेसळअमरावती शहरात दुधातही मोठ्या प्रमाणात भेसळीचे प्रमाण पुढे आले आहे. स्टोअरेजमध्ये दुधातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे दूध कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवणे गरजेचे असते. दूध नासू नये म्हणून त्यात अल्कली सोडा वापरला जातो. तो आरोग्यास घातक आहे. एसएनएफ (सोलीड नॉट फॅट) वाढावे म्हणून दुधात साखर मिसळली जाते.