शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग दलाचे धाडसत्र, प्रेमीजनांची पळापळ!

By admin | Updated: February 15, 2015 00:01 IST

शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह ओसंडून वाहात होता. तरूणाईने आपापल्यापरिने प्रेमदिन अविस्मरणीय करण्याकरिता नियोजन केले होते.

अमरावती : शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह ओसंडून वाहात होता. तरूणाईने आपापल्यापरिने प्रेमदिन अविस्मरणीय करण्याकरिता नियोजन केले होते. मात्र, शहरातील हॉटेल व रेस्टॉरेंट्समध्ये प्रेमालाप करणाऱ्या जोडप्यांना बजरंग दलाने हुसकावून लावल्याने प्रेमीयुगुलांमध्ये गोंधळ उडाला. बजरंग दलाच्या या आक्रमक भूमिकेमुळे ‘व्हॅलेंटाईन डे’ अविस्मरणीय करण्यास निघालेल्या जोडप्यांचा प्रचंड विरस झाला. ‘व्हॅलेंटाईन डे’वर संस्कृतीच्या अवहेलनेचा ठपका ठेवून या दिवसाचा सातत्याने विरोध करणाऱ्या विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाने शहरातील तरूणाईच्या डोळ््यांत अंजन घालण्याच्या उद्देशाने शनिवार १४ फेब्रुवारी रोजी देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शहिदांना इर्विन चौक येथील शहीद स्तंभावर मानवंदना अर्पण केली. शहिदांना सलाम केल्यानंतर हे संस्कृती रक्षक थेट शिवटेकडीवर पोहोचले. परंतु या ठिकाणी कोणताही गैरप्रकार नव्हता. केवळ दोन जोडपी याठिकाणी आढळून आल्यात. पश्चात या कार्यकर्त्यांनी त्यांचा मोर्चा गाडगेनगरातील एका प्रसिध्द कॉफी शॉपकडे वळविला. या कॉफी शॉपमध्ये एकांत शोधणाऱ्या जोडप्यांना हुसकावून लावले. त्यामुळे बेसावध तरूण-तरूणींची तारांबळ उडाली. मिळेल त्या वाटेने या जोडप्यांनी पळ काढला. शहरात दरवर्षी विरोधाच्या सावटाखाली 'व्हॅलेंटाईन डे' साजरा होतो. विरोधाला न जुमानता तरूणाई चोरट्या मार्गाने एकांत शोधत फिरते. अनेक गैरप्रकारही होतात. अश्लील प्रकार आढळतात. त्यामुळेच बजरंग दल व विहिंपद्वारे आक्रमक भूमिका घेत असल्याचे सांगण्यात येते. कॉफी बारमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी बजरंग दल व विहिंपचे कार्यकर्ते धडकले. या मोहिमेत निरंजन दुबे, रोहित कोठार, कुणाल देवासे, इंद्रकांत तिवारी, पवन श्रीवास, सत्यजित दुबे, विपिन गुप्ता, आकाश ठाकूर, शेखर सयाम, त्रीदेव डेंडवाल, विश्वजीत दुबे, श्रेयस चिम, अर्जुन दिघडे, विक्की ठाकूर, विक्की चावरे, अभिषेक सिंह, अमोल बॉक्सर, नितेश सिंह उपस्थित होते. (प्रतिनिधी)