बहिरमला विदेश दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:38+5:302021-02-06T04:21:38+5:30

६५ हजारांचा मुद्देमाल जप्त परतवाडा : दुचाकी वाहनात अवैधरीत्या दारुची चोरटी वाहतुक करणाऱ्याला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ...

Bahiram caught foreign liquor | बहिरमला विदेश दारु पकडली

बहिरमला विदेश दारु पकडली

६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

परतवाडा : दुचाकी वाहनात अवैधरीत्या दारुची चोरटी वाहतुक करणाऱ्याला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यात १० हजार ५०० रुपये किमतीचे विदेशी दारुचे १४ नग (प्रत्येकी १ लिटर), १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि ४५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकीसह एकूण ६५ हजार ५०० रुपये किंमतीच्या मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या जप्त मालासह आरोपी सचिन राठोड (२५) रा. आठनेर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरजगाव कसबा पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. ही कारवाई २ फेब्रुवारी रोजी एलसीबीचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे व सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे यांचे मार्गदर्शनाखाली एनपीसी सुनील महात्मे, सय्यद अजमत, स्वप्निल तंवर, योगेश सांबरे, मंगेश लकडे यांनी केली.

Web Title: Bahiram caught foreign liquor