शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वपूर्ण विभागांकडे लक्ष

By admin | Updated: May 7, 2015 00:01 IST

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पहिल्या टप्प्यात प्रभारी अधिकारी पदांच्या जागांवर पदोन्नती देण्याची कार्यवाही केली ...

अमरावती : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पहिल्या टप्प्यात प्रभारी अधिकारी पदांच्या जागांवर पदोन्नती देण्याची कार्यवाही केली आहे. मात्र एकाच विभागात टेबलवर अविरतपणे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात एका विभागातून दुसऱ्या विभागात कर्मचाऱ्यांची बदली झाली तर वावगे ठरु नये, हे खरे आहे. सामान्य प्रशासन विभागात पदोन्नतीवर मंगेश जाधव यांच्या जागी अलुडे हे पदोन्नतीवर अधीक्षकपदी रुजू झाले आहेत. जाधव यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकपदाचा कारभार सोपविण्यात आला होता. परंतु आयुक्त गुडेवार हे रुजू होताच त्यांनी महत्त्वपूर्ण विभागाकडे लक्ष वेधून ढिसाळ कारभारावर नियंत्रण आणण्याची कारवाई केली आहे. हल्ली सामान्य प्रशासन विभागात यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. विभागनिहाय कर्मचाऱ्यांची यादी तसेच कार्यरत असलेले वर्ष आदींची माहिती गोळा केली जात आहे. प्रभारी कारभार हाकणाऱ्या कनिष्ठ लिपीकांना पूर्व पदावर आणण्याची कारवाई आयुक्तांनी करताच काही कर्मचाऱ्यांमध्ये आनंद पाहावयास मिळाला आहे. दुसरीकडे विभागनिहाय बदल्यांची प्रक्रिया केंव्हा राबविली जाणार याकडे लक्ष लागले आहे. तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळातच विभागनिहाय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या बदल्या प्रलंबित राहिल्यात. अखेर आयुक्त गुडेवार यांनी प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची फाईल नव्याने सुरु करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विभागनिहाय बदल्यांमध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोठे बदली केली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)महापौर, आयुक्त, उपायुक्त, झोन कार्यालयांवरही लक्षकर्मचाऱ्यांची बदली करताना केवळ महापालिकेचे मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्याच बदलीची प्रक्रिया राबविली जाणार असे नाही तर यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त, उपायुक्त, झोन कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचीही बदली केली जाईल, असे संकेत आहे. काही कर्मचारी वर्षांनुवर्षे एकाच मलईदार टेबलवर कार्यरत असून अशा कर्मचाऱ्यांची बदली करण्याला आयुक्तांनी प्राधान्य दिल्याची माहिती आहे.