शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST

----------------- कपाळावर दगड मारून जखमी केले मंगरूळ चव्हाळा : मुलाला मारण्यास धावलेल्या युवकाला हटकल्यावरून कपाळावर दगड मारून जखमी केल्याची ...

-----------------

कपाळावर दगड मारून जखमी केले

मंगरूळ चव्हाळा : मुलाला मारण्यास धावलेल्या युवकाला हटकल्यावरून कपाळावर दगड मारून जखमी केल्याची घटना पळसमंडळ येथे घडली. अमोल भाऊराव ढगे (३८) यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रमोद दुर्योधन जांभळे (३५, रा. पळसमंडळ) विरुद्ध मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

------------------

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

परतवाडा : शहरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २७ जून रोजी उघडकीस आली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी प्रवीण प्रकाश बोरसे (२३, रा. एकतानगर, कांडली) विरुद्ध २८ जून रोजी गुन्हा नोंदविला.

-------------------

पोल्ट्री फार्मचे साहित्य घेऊन मजूर पसार

अंजनगाव सुर्जी : शेतात कामावर असलेला मजूर पोल्ट्री फार्ममधील पाच हजारांचे साहित्य घेऊन पसार झाल्याची घटना २३ जून रोजी उघडकीस आली. प्रमोद रामदास येऊल (रा. अंजनगाव) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी आरोपी दिनेश इंदरसिंह पराते (रा. खैरलांजी, छिंदवाडा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

मद्यपीकडून वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

अंजनगाव सुर्जी : दारू पिऊन मुलाने वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील धनेगाव येथे २८ जून रोजी घडली. फिर्यादी शांतीलाल बळीराम गायगोले यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रज्ज्वल शांतीलाल गायगोलेविरुद्ध अंजनगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

------------

दुचाकीवर बसवून आणलेल्या युवकाला मारहाण

येवदा : सोबत मद्यपान करून दुचाकीवर बसवून आणलेल्या युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना २८ जून रोजी रामतीर्थ येथे घडली. गजानन पुंडलिक वानखडे (३२) यांच्या तक्रारीवरून येवदा पोलिसांनी नीलेश प्रकाश खडे (२८, रा. रामतीर्थ) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

क्षुल्लक कारणावरून महिलेला मारहाण

शेंदूरजना घाट : शेजारी सब्बल आणण्यास पाठविलेल्या महिलेला येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून जखमी करण्यात आले. ही घटना मलकापूर येथे २८ जून रोजी सकाळी घडली. महिलेच्या तक्रारीवरून शेंदूरजना घाट पोलिसांनी अंबादास वामनराव बागडे (५०, रा. मलकापूर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

मुलीला पळविले, संशयिताविरुद्ध गुन्हा

मंगरूळ दस्तगीर : कामावर निघालेली मुलगी सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी तिच्या मैत्रिणीला विचारपूस केली. मात्र, मिळून आली नाही. संशयिताने पळवून नेल्याच्या तक्रारीवरून मंगरूळ पोलिसांनी संशयित अतुल बळवंत उमाळेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

धुऱ्यावरून वाद, इसमाला मारहाण

कुऱ्हा : शेताच्या धुऱ्यावरून पायी जाणाऱ्या शेतकऱ्याला अडवून वाद करीत बाशाने मारहाण केल्याची घटना २८ जून रोजी दुपारी १२.३० वाजता शिदवाडी शिवारात घडली. मदन हिरासिंह राठोड (५०) यांच्या तक्रारीवरून प्रकाश श्रीराम जाधव (४०, रा. शिदवाडी) विरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्रकाश श्रीराम जाधव यांच्या तक्रारीवरून मदन व मनोहर हिरासिंग राठोड (४७), शरद पंडित राठोडविरुद्ध संत्राझाडांची छाटणी केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला. ------------------

-------------