शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महसूल यंत्रणेच्या कामाचे दर महिन्याला मूल्यमापन

By admin | Updated: October 25, 2016 00:11 IST

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करून महसुली उत्पन्नात वाढ व्हावी,...

धोरण : कामाचा त्रैमासिक अहवाल सादर करावा लागणारअमरावती : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करून महसुली उत्पन्नात वाढ व्हावी, या माध्यमातून सन २०१६-१७ ची महसूल विभागाची फलनिष्पती क्षेत्र निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त, भूमि अभिलेख संचालकांसह जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कामाचे मूल्यमापन होणार असून मासिक अहवाल सादर करावा लागणार आहे. शासनाने ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर सुरू केला आहे. यात हस्तलिखित सातबारा बंद करून ई फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे. सर्व तहसील कार्यालये, अधीक्षक भूमिअभिलेख यांचे कार्यालयात अभिलेखांचे स्कॅनिंग पूर्ण करणे, अभिलेखांच्या मेटा डेटा एन्ट्रीचे काम पूर्ण करून देणे या कार्याचा यात समावेश आहे. तसेच केआरएची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत, अंमलबजावणीचा मासिक प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना व विभागीय आयुक्तांकडून शासनाकडे त्रैमासिक अहवाल सादर करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे नियमित आढावा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. महाराजस्व अभियानाची जबाबदारी जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न निकाली काढावे लागणार आहेत. कारण महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केआरएअंतर्गत या कार्यक्रमाचीही जबाबदारी विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रलंबित कामांची होणार पडताळणीकेआरएमध्ये शासन ११ एप्रिल २०१६ रोजीच्या प्रलंबित प्रकरणाची पडताळणी करून मूल्यमापन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची फलनिष्पत्ती दर्शविण्यासाठी सन २०१३-१४ च्या फेरफार नोंदीची प्रत्येक महिन्याची आकडेवारीची तुलना २०१६-१७ मधील त्या-त्या महिन्याच्या ई-फेरफार नोंदीच्या आकडेवारीशी करण्यात येईल.महसूल विभागाने फलनिष्पत्ती क्षेत्र निश्चित केले आहे. त्या निश्चितीनुसार कामकाजाचे मूल्यमापन केले जाणार आहे. यामुळे प्रशासन गतिमान होण्यास मदत होईल.- प्रवीण ठाकरे, उपजिल्हाधिकारी, महसूल विभाग