आसेगाव ग्रामपंचायतीला गाडगेबाबा जयंतीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST2021-02-25T04:14:34+5:302021-02-25T04:14:34+5:30

चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत आसेगाव पूर्णा येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त ...

Asegaon Gram Panchayat forgets Gadge Baba Jayanti | आसेगाव ग्रामपंचायतीला गाडगेबाबा जयंतीचा विसर

आसेगाव ग्रामपंचायतीला गाडगेबाबा जयंतीचा विसर

चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत आसेगाव पूर्णा येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्हा संत गाडगेबाबांची जन्मभूमी आहे. याच भूमीत त्यांचे कार्य झाले. याबाबत स्थानिक ग्रामविकास अधिकारी डी.एस. भुसकट यांच्याशी संपर्क साधला असता, मी रजेवर असल्याने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जयंती झाली किंवा नाही, याबाबत माहिती नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

----------

निधन

इंदिरा सावरकर

फोटो -

अंबाडा : इंदिरा गुलाबराव सावरकर (७५, रा. अंबाडा) यांचे हृदयविकाराने निधन झाले. स्थानिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भजनी मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व बराच आप्तपरिवार आहे.

-----------

निधन

फोटो -

विजया स्वस्तीकर

अमरावती : विजया मधुकरराव स्वस्तीकर (७८, रा. न्यू तापडियानगर, अकोला) यांचे फेब्रुवारीला अल्पशा आजाराने निधन झाले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत धनंजय पाटील यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.

Web Title: Asegaon Gram Panchayat forgets Gadge Baba Jayanti