शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चांदूररेल्वे वनविभागात कृत्रिम पाणवठे

By admin | Updated: April 10, 2017 00:23 IST

चांदूररेल्वे उपविभागीय वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

उपक्रम : वन्यप्राण्यांच्या शिकारीवर वनविभागाची करडी नजरचांदूररेल्वे : चांदूररेल्वे उपविभागीय वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यामुळे जंगल सोडून पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ वन्यप्राण्यांवर आली नाही. वन्यप्राण्यांच्या शिकारीवरदेखील वनविभागाची करडी नजर राहणार आहे. या उपक्रमाचा वन्यप्राण्यांना अधिक लाभ होत आहे. पावसाळ्यात वनविभागातील लहानमोठ्या नाल्यांना भरपूर पाण्याचे स्त्रोत असतात. छोटे बंधारेही बांधण्यात आले. त्यात पाण्याचा साठा उन्हाळा लागण्यापूर्वी शिल्लक होता. परंतु आता उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वनविभागाचे अधिकाऱ्यांनी कृत्रिम पाणवठे तयार करून मुबलक पाण्याची सोय वन्यप्राण्यांना करून दिली आहे. कृत्रिम पाणवठ्यासाठी प्रथम जंगलात ५०० मीटर अंतरावर योग्य जागा निवडून त्या ठिकाणी खड्डे तयार करण्यात आले. त्यात खड्ड्यात गवताचे आच्छादन करून त्यावर प्लास्टिकची चादर पसरविण्यात आली. त्यावर दगडावर रेती टाकून कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी अनंत गावंडे यांच्याकडून देण्यात आली. आजपर्यंत १५ पाणवठे पूर्ण झाले असून त्यात मशीनद्वारे मजूर लावून दररोज पूर्ण पाणवठे पाण्याने भरण्याचा उपक्रम सुरू आहे. पाणवठे नसले तर वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकंती होऊन अवैध शिकाऱ्यापासून धोका होऊ नये म्हणून पाणवठे करण्याचा उपक्रम वन विभागाकडून राबविण्याचा उपक्रम सुरू असतो. (तालुका प्रतिनिधी)