अमरावती : अस्तित्व लपवून चोरीच्या इराद्याने फिरणाऱ्या आरोपीला बडनेऱ्याच्या पोलीस वसाहत नजीकच्या कोंडेश्वर मार्गावरून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. शेख मेहमुद उर्फ ममद्या शेख फकरून (४४, रा. चमन नगर बडनेरा जुनी वस्ती) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
--------------------------------------------------------
निंभोेरा येथे जुगार पकडला
अमरावती: बडनेरा पोलिसांनी येथील भातकुली तालुक्यातील निंभोरा येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह २३३५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी गोपीचंद हिरामण मेश्राम (४८, रा. पाचबंगला जुनी वस्ती बडनेरा) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईलही जप्त केला.
------------------------------------------------
विलासनगरात वरली-मटका पकडला
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी विलासनगर येथे कारवाई करून वरली मटका साहित्यासह १३०५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी प्रकाश देविदास धावणे (४४, रा. विलासनगर) असे आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई ही गुन्हे शाखेचे पीएसआय नरेशकुमार मुंडे यांनी केली.
----------------------------------------------------
आष्टी येथे जुगार पकडला
अमरावती : आष्टी येथे पोलिसानी कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह २०४० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी विलास तुकाराम प्रधान (५२, रा. आष्टी)विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------------------
इतवारा बाजारात जुगार अड्ड्यावर धाड
अमरावती : गुन्हे शाखेच्या पथकाने येथील इतवारा बाजार परिसरातील बारदाना गल्लीत जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ११३५ रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त केला. याप्रकरणी आरोपी रितेश किशोर साहू (४२, रा. चेतनदास बगीचा मसानगंज) विरुद्ध गुन्हा नोंदविला.