शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

गोवारींचे अर्धनग्न आंदोलन

By admin | Updated: August 3, 2014 23:05 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोवारींना आदिवासींच्या सवलती मिळत असताना शासनाने या सवलती बंद करून ११४ निष्पाप गोवारींचे बळी घेतले. तरीही मुख्य सवलती न दिल्यामुळे राज्यातील २४ लाख

सवलतीसाठी युवकांचे आंदोलन : नागपुरातून चालविली तयारीधामणगाव रेल्वे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोवारींना आदिवासींच्या सवलती मिळत असताना शासनाने या सवलती बंद करून ११४ निष्पाप गोवारींचे बळी घेतले. तरीही मुख्य सवलती न दिल्यामुळे राज्यातील २४ लाख गोवारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत़ यासाठी नागपूर येथून आंदोलनाची तयारी असून अर्धनग्न आंदोलनाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले़ गोवारी ही मूळची आदिवासी जमात १० सप्टेंबर १९५६ रोजी अनुसूचित जमातीत गोवारीऐवजी गोंडगोवारी असा शब्द अंतर्भूत करण्यात आला आणि सर्व गोवारींना २३ एप्रिल १९८५ पर्यंत गोवारींनाही 'गोंडगोवारी' अशी प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली़ परंतु २४ एप्रिल १९८५ रोजी काँग्रेस शासनाने एक शासकीय अध्यादेश काढून गोवारींना अनुसूचित जमातीच्या मिळणाऱ्या सवलती काढून घेतल्या़ तेव्हापासून हा समाज न्याय्य हक्कासाठी लढा देत आहे़ एकीकडे या आदिवासी गोवारींची दुसरी पिढी सवलतीसाठी संघर्ष करीत गारद झाली. दुसरीकडे या गोवारींना सवलती मिळू नये म्हणून राज्यातील काही आदिवासींचे आमदार विरोध करीत असल्याचा आरोप गोवारी समाजाकडून होत आहे़ या आदिवासी गोवारी जमातीचे अस्तित्व स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे़ १८६९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या जनगणनेत गोवारी भाषा बोलणाऱ्यांची संख्या २ हजार ५१७ असल्याची नोंद इतिहासात आहे़ मार्टीन यांनी दिलेल्या अहवालात गोवारी ही एक आदिवासी जमात असल्याची नोंद आहे़ रिसेल आणि हिरालाल यांनी लिहिलेल्या पुस्तकात आदिवासी जमात अशा नोंदी या जमातीच्या नावाने आहे़ सी़पी़अ‍ॅन्ड बेरारच्या नोटीफिकेशनमध्ये ४ नोव्हेंबर १९४१ च्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये गोवारी ही मुळ आदिवासी असल्याचे स्पष्ट आहे़ राज्य शासनाने गोवारींना विशेष मागास प्रवर्गाच्या सवलती दिल्या. परंतु या सवलतीत गोवारींचा टिकाव लागत नसल्याची वस्तुस्थिती युवा शक्तीचे कार्याध्यक्ष नंदू सहारे यांनी मांडली आहे़ गत आठवड्यात नागपूर येथे संयुक्त समितीची बैठक झाली. गोवारी समाजाला न्याय्य हक्काच्या सवलतीपासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी राज्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ ७ आॅगस्ट रोजी नागपूर येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. गोवारी युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त समितीचे कैलास राऊत, नंदू सहारे, मारोतराव नेवारे, भाष्कर राऊत, शांताराम राऊत, श्रीराम नेवारे, ओंकार राऊत, जनार्दन दुधकवरे, प्रभू काळसर्पे, मुरके, गजानन कोहळे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)