शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:37 IST

शहराच्या मध्यवस्तीतील आॅइल मिल व्यापाऱ्याच्या घरावर रविवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा घालण्यात आला. सहा दरोडेखोरांनी अडीच लाख रुपये व दागिने असा तब्बल २१ लाखांचा ऐवज लुटला.

ठळक मुद्देरविवारच्या मध्यरात्रीनंतरचा थरार : २१ लाखांचा ऐवज लुटला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहराच्या मध्यवस्तीतील आॅइल मिल व्यापाऱ्याच्या घरावर रविवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा घालण्यात आला. सहा दरोडेखोरांनी अडीच लाख रुपये व दागिने असा तब्बल २१ लाखांचा ऐवज लुटला.बसस्थानक मार्गावर कश्यप पेट्रोल पंपासमोर राहणारे विवेक मुरलीधर अग्रवाल (५७) यांच्या घरी दरोडा पडला. रविवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास अग्रवाल कुटुंब गाढ झोपेत असताना सहा दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. विवेक अग्रवाल, त्यांच्या पत्नी आणि आई सुधा अग्रवाल यांना झोपेतून उठवत दरोडेखोरांनी त्यांना लोखंडी रॉड व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिन्यांची मागणी केली.अग्रवाल दाम्पत्य व त्यांच्या आईचे हात कापड व दोरीने बांधून त्यांनी घरात हैदोस घातला. कपाटात असलेली अडीच लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २० लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले.वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळीकुटुंबीयांना कसाबसा धीर देत अग्रवाल यांनी दरोड्याची माहिती पोलिसांना दिली. गस्तीवर असलेले पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नाकाबंदी करण्यात आली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या श्वानाने घटनास्थळाच्या मागील बाजूस असलेल्या शांती दाल मिलच्या दिशेने धाव घेतली. यादरम्यान रस्त्यात पडलेले दहा हजारांचे बंडल पोलिसांच्या हाती लागले. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनीही घटनास्थळी भेट दिली तथा अधिनस्थांना सखोल चौकशीचे आदेश दिले. या दरोड्याने शहरात दहशत पसरली होती.असा आहे घटनाक्रमपोलिसांनुसार, रविवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घराचा मागील दरवाजा व ग्रील तोडून दरोडेखोर आत शिरले. त्यांनी सर्वप्रथम पहिल्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामध्ये विवेक अग्रवाल यांचा मुलगा विनय हा झोपलेला होता. नंतर हे दरोडेखोर विवेक व अवंतिका अग्रवाल या दाम्पत्याच्या बेडरूमसह सुधा अग्रवाल (८५) यांच्याकडे वळले. तिघांचेही हातपाय दोरीने बांधण्यात आले तसेच त्यांना लोखंडी रॉड व चाकूचा धाक दाखवून ऐवज लुटला.दरोडेखोरांनी मागितल्या चाव्याअग्रवाल कुटुंबाला ओलीस ठेवत दरोडेखोरांनी त्यांना चूपचाप पडून राहण्यास सांगितले. विवेक अग्रवाल यांना घरातील तिजोरीच्या चाव्या मागितल्या. दरोडेखोर ‘पैसे दो, पैसे दो’ असे ओरडत होते. या दरोड्याने अग्रवाल कुटुंबीय भयभीत झाले होते. एक तास हा थरार चालला. मोठा ऐवज मिळाल्यानंतर त्यांनी पळ काढला.हिंदी भाषिक असल्याचा कयासतोंडाला कापड बांधलेले ३० ते ३५ वर्षे वयोगटातील सहाही दरोडेखोर हिंदीत बोलत होते. त्यांनी हिंदीतच अग्रवाल यांना दरडावले. त्या दरोडेखोरांपैकी एखाद्याला पळताना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्रवाल यांच्या घराच्या ज्या मागील बाजूने त्यांनी पळ काढला, तेथे रक्ताचे डाग दिसून आलेत.तपासासाठी चार पथके नेमली आहेत. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तपासाला वेग देण्यात आला आहे.- श्याम घुगे, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण)