शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चंदन तस्करांच्या हल्ल्यानंतर एपीआयने झाडली गोळी

By admin | Updated: August 11, 2015 00:11 IST

चंदन तस्करांच्या हल्ल्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यातील एपीआय फिरोज खान पठाण यांनी आरोपीवर गोळी ..

आरोपींचे पलायन : तपोवन परिसरातील संकेत कॉलनीतील घटनाअमरावती : चंदन तस्करांच्या हल्ल्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यातील एपीआय फिरोज खान पठाण यांनी आरोपीवर गोळी झाडली. ही घटना रविवारी उत्तररात्री २.३० वाजताच्या सुमारास तपोवनजवळील संकेत कॉलनीत घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी मध्यरात्री नाकाबंदी केली होती. गाडगेनगर पोलीस ठाण्यातील एपीआय फिरोज खान पठाण यांचे पथक रविवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान एका दुचाकीवरून दोन चंदन तस्कर चंदनाची खोडे घेऊन जात असल्याची माहिती पठाण यांना मिळाली होती. एपीआय पठाण यांनी त्या दुचाकीचा पाठलाग सुरु केला. व्यंकय्यापुऱ्याजवळील महापौर बंगल्याजवळून पोलिसांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग करून त्यांना तपोवननजीकच्या संकेत कॉलनीजवळ गाठले. चंदनतस्करांच्या दुचाकीला किरकोळ धडक देऊन त्यांना थांबविले असता त्यांच्या दुचाकीवरील चंदनाचे खोड रस्त्यावर पडले. एपीआय पठाण वाहनातून उतरताच दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने कोयता काढून त्यांच्यावर वार केला. मात्र, सावध असलेल्या पठाण यांनी तो वार हुकवला. हुलकावणी देण्याकरिता ते खाली वाकले असतानाच संधी साधून चंदन तस्करांनी दुचाकी घेऊन पळ काढला. त्यामुळे पठाण यांनी तत्काळ सर्व्हीस रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या भरून चंदन तस्करांवर गोळी झाडली. मात्र, नेम चुकल्याने तस्करांनी हायवेच्या दिशेने पलायन केले. पठाण यांनी तत्काळ या घटनेची सूचना पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना दिली. त्यावेळी घार्गे अन्य भागात गस्त घालत असल्याने ते त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लगेच नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेणे सुरु केले होते. वृत्तलिहेस्तोवर आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसून यापूर्वीच्या चंदन तस्करांची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)२५ हजारांचे चंदन जप्तचंदन तस्करांनी पलायन केल्यावर शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान महापौर बंगल्यासमोर चंदनाची चार खोडे पडलेली पोलिसांना आढळून आली. घटनास्थळावर आढळलेली आणि महापौर बंगल्यासमोर सापडलेली अंदाजे २५ हजारांंच्या जवळपास चंदनाची खोडे पोलिसांनी जप्त केली आहेत. नाकाबंदीत महाबीजमधील चोराला अटकचंदन तस्करांच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान महाबीजचे गोदाम फोडून तीन चोरटे कटल्यात बियाण्याच्या १८ बॅग घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कटल्यासह आकाश विठ्ठल पाटील, धनंजय मडावी व अन्य एकाला अटक केली. काही वेळाने आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले. अद्याप चंदन चोरीची तक्रार नाहीमहिनाभरापूर्वी चंदन तस्करांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात, न्यायाधीश बंगला व कांतानगरातील चंदनाची झाडे चोरून नेली. यावेळी पोलिसांनी चंदनाच्या वृक्षांच्या नोंदी घेतल्या होत्या. या परिसरात १५० च्या आसपास चंदनाच्या झाडांची नोंद केली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. चंदन चोरीचा फंडा वेगळाचचंदनाची चोरी करताना तस्कर कोयता अथवा विळ्याने वृक्षाचा पाच ते सहा फुटाचा आतील गाभा कापतात. खोड काढून तो कापलेला भाग पुन्हा वरवर जोडून ठेवण्यात येते. यामुळे चंदनाची चोरी झाल्याचे लगेच लक्षात येत नाही. मात्र, दोन ते दिवसांनंतर चंदनाचे झाड वाळल्यावर चंदनाचे खोड चोरीला गेल्याचे लक्षात येते. असा विचित्र फंडा चोरटे चंदन चोरीसाठी वापरतात.