शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय कार्डधारकांना महाराष्ट्र दिनाला मिळणार मोफत साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:23 IST

Amravati : 'अंत्योदय'च्या १.२८ लाख लाभार्थीना रेशन दुकानातून मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १.२८ लाख अंत्योदय कार्डधारकांना यावेळी होळीला मोफत साडी मिळालेली नाही. मात्र, अन्य जिल्ह्यात साड्यांचे वितरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थीमध्ये नाराजी होती. अखेर काही तालुक्यांमधील गोदामात साड्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनापासून वाटपाचा मुहूर्त असल्याची माहिती आहे.

गतवर्षी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १,२८,२१२ अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्यात आली होती. तसेच दरवर्षी एक मोफत साडी या लाभार्थी कुटुंबांना देण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात यावर्षी होळी आटोपली तरी रेशन दुकानातून साडी मिळालेली नव्हती. प्रत्यक्षात काही जिल्ह्यांत मात्र रेशन दुकानांतून मोफत साड्यांचे वितरण करण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. आता मात्र काही तालुक्यांतील गोदामात साड्यांचा पुरवठा झालेला आहे. शिवाय, अन्य तालुक्यांतदेखील पुरवठा होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. 

जिल्हा स्थितीअंत्योदय रेशन कार्डधारक : १,२८,२०७प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक: ३,७४,३३६

सणासुदीत आनंदाचा शिधा केव्हा ?अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून १०० रुपयांत आनंदाच्या शिधाची किट देण्यात येत असते. गतवर्षी श्रीराम नवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिधा देण्यात आला होता. यंदा मात्र शासनाला आनंदाच्या शिधाचा विसर पडला आहे. 

"अंत्योदय रेशन कार्डधारकांना एक मोफत साडी रेशन दुकानातून मिळणार आहे. यासाठी काही तालुक्यांतील गोदामात साड्या उपलब्ध झालेल्या आहेत. लवकरच त्याचे वितरण करण्यात येईल."- निनाद लांडे, डीएसओ

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती