शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेपूर्वीच उत्तरे विद्यार्थ्यांच्या हाती

By admin | Updated: September 25, 2015 00:57 IST

शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पायाभूत चाचणी परीक्षा : शासन निर्णयाला शाळा व्यवस्थापनाची तिलांजलीवैभव बाबरेकर  अमरावतीशिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आधीच परीक्षेची उत्तरे सांगून शिक्षकांनी या पायाभूत चाचण्यांचा पार कचरा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा कसा उच्च आहे, हे दर्शविण्यासाठी सर्रास हा प्रकार विविध शाळांच्या व्यवस्थापनाकडून केला जात आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचे चित्र आहे. शासनाने शिक्षणाच्या दर्जा उंचाविण्यासाठी व विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचण्या घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, त्यांचा शैक्षणिक दर्जा आदींचा आढावा घेण्याचा शासनाचा उद्देश आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक अशा २ हजार २०० शाळा आहेत. या शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. गतवर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले आहेत. या परीक्षेचे स्वरूप नेहमीच्या परीक्षेपेक्षा वेगळे आहे.विद्यार्थ्यांच्या सोयी आणि त्यांच्या क्षमतेनुसार तणावरहित वातावरणात ही परीक्षा घेण्यात येत आहे. १४ ते ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ही पायाभूत चाचणी घेण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. सर्वच ठिकाणी एकाच वेळी किंवा एकाच दिवशी ही चाचणी परीक्षा घेणे बंधनकारक नाही. त्यामुळे विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार विविध वेळेत ही परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी शासनाने पायाभूत चाचण्या घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रश्नांची उत्तरे जर विद्यार्थ्यांना आधीच सांगितली जात असतील तर ते चुकीचे आहे. हा प्रकार थांबविण्याच्या सूचना शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत देऊ. -अशोक सोनवणे, प्र. शिक्षण उपसंचालक.जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. यात काही गैरप्रकार होत असतील तर संबंधित शाळेची चौकशी करण्यात येईल. - श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक).आमच्या शाळेत असे चुकीचे प्रकार घडत नाहीत, याबाबत शहानिशा करायची असल्यास मुलांनाही विचारू शकता. सर्व चाचणी परीक्षा सुव्यवस्थित पार पडत आहेत. - सुषमा देशमुख, मुख्याध्यापिका (प्राथमिक)असे काहीच झाले नाही. पायाभूत चाचणी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका नेटवर उपलब्ध आहेत. त्यातच काही विद्यार्थ्यांचे पालक स्वत: शिक्षक आहेत. त्यामुळे नेटवरून ते प्रश्नपत्रिका काढू शकतात. आम्ही १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचा सराव घेत आहोत. अत्यंत गोपनीय व नियमानुसार परीक्षा घेतली जाते. - उज्ज्वला कुळकर्णी, मुख्यध्यापिका (माध्यमिक)