शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
4
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
5
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
6
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
7
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
8
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
9
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
10
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
11
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
12
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
13
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
14
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
15
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
16
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
17
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
18
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
19
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
20
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
Daily Top 2Weekly Top 5

अन् शेतकऱ्याने गुरांपुढे टाकली वांगी

By admin | Updated: September 7, 2016 00:11 IST

अधिक उत्पादन व मागणी घटल्याने लाखो रूपये खर्च करूनसुद्धा मातीमोल भाव मिळत असल्यामुळे...

!बळीराजा संकटात : लाखोंचा खर्च अन् कवडीचा दरनरेंद्र जावरे परतवाडाअधिक उत्पादन व मागणी घटल्याने लाखो रूपये खर्च करूनसुद्धा मातीमोल भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने वांगी चक्क गुरांपुढे टाकून त्यांचा चारा केला.हा प्रकार नजीकच्या टवलार येथे मंगळवारी घडला. पथ्रोट, टवलार, शिंदी आदी परिसरात सर्वाधिक प्रमाणात हिरव्या वांगींचे उत्पादन घेतले जाते. मात्र, पेरणी जास्त झाल्याने उत्पादनात कमालीची वाढ झाली व दर मातीमोल झाले. टवलार येथील पवन पातोंड, प्रशांत मामनकर, चेतन नागे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही वांगीची पेरणी केली. शेतातील इतर पिकांचा खर्च, फवारणी, निंदण, तोडणीचा खर्च वजा जाता काही पैसे शिल्लक राहण्याचे गणित त्यांनी वांगी पिकाच्या आधारे मांडले होते. अधिक उत्पादनासाठी पाहिजे त्याप्रमाणात मेहनतसुद्धा घेतली. मात्र अल्प दरामुळे त्यांची निराशा झाली. शेतकऱ्यांना वांगी अक्षरश: गुरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे. कांदे, टोमॅटोनंतर वांगीअचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ओलिताची सोय आहे. जवळपास चार प्रकल्प असल्याने मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येथे बागायतदार शेतकरी पालेभाज्यांचे उत्पादन घेतात. यापूर्वीच भाव न मिळाल्याने कांदा आणि टोमॅटो गुरांना टाकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. आता वांग्याची ही स्थिती झाल्याने पेरावे काय, असा सवाल त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. आंध्रप्रदेशासह सर्वदूर मागणी‘सिजटा’ कंपनीच्या हिरव्या वांग्याला बंगळूरू, हैद्राबाद, करीमनगर, चंद्रपूर, नागपूर आदी बड्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परतवाडा येथून दररोज किमान दहा ट्रक वांगी विविध ठिकाणी पाठविली जातात. मात्र, उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.रुपया किलोनेही मागणी नाहीहिरव्या वांगीचे उत्पादन अधिक झाल्याने नेहमीप्रमाणे बाजारात त्याचे मूल्य घसरले. तोडणी, फवारणीचा खर्च निघावा म्हणून तोडलेली वांगी रुपया किलोनेसुद्धा कुणी घ्यायला तयार नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी गुरांपुढे मांडून संताप व्यक्त केला.