शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘धम्माल गल्ली’मुळे अमरावतीकर ‘रिचार्ज’

By admin | Updated: May 12, 2015 00:11 IST

‘रूटीन’च्या जरा पलीकडे जाऊन थोडा वेळ मनासारखे जगण्याची संधी आबालवृद्धांना मिळण्याच्या उद्देशाने ...

विविध उपक्रम : शाळकरी विद्यार्थी, तरूणाई आणि महिलांची धम्माल अमरावती : ‘रूटीन’च्या जरा पलीकडे जाऊन थोडा वेळ मनासारखे जगण्याची संधी आबालवृद्धांना मिळण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’द्वारे इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर रविवारी आयोजित ‘धम्माल गल्ली’ कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे यावेळीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटे साडेसहा वाजता इर्विन चौकात ‘धम्माल गल्ली’ला सुरूवात झाली. बच्चेकंपनी आजी-आजोबा आणि आई-बाबांचा हात धरून आधीच इर्विन चौकात पोहोचली होती. यावेळी गल्ली क्रिकेटने कार्यक्रमात रंगत आणली. घरूनच आणलेली बॅट, बॉल आणि स्टम्प घेऊन जागा मिळेल तेथे चौकार, षटकारांची बरसात सुरू झाली.पहाटेच्या वेळी धम्माल गल्लीच्या मंचावरून सोनल कॉलनीतील मैथिली महिला भजनी मंडळाद्वारे सादर भजनांच्या कार्यक्रमामुळे वातावरण शुचिर्भूत झाले होते. याच महिला भजनी मंडळाने रस्त्यावर फुगडीचा फेरही धरला. राजेश्वरी युनियन शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रात्यक्षिक करून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना खिळवून ठेवले. तरूण आणि बच्चे कंपनीने गल्ली क्रिकेट खेळून धम्माल उडवून दिली. लाठीकाठीच्या स्तब्ध केले. लाठीकाठी, व्हॉलीबॉलच्या खेळांनीही या धम्माल गल्लीत रंगत आणली. स्टार डान्स अकादमीच्या नितीन आसुदानी यांच्या पपेट शो ला देखील प्रतिसाद मिळाला. जिल्हा स्केटिंग क्लबच्या विद्यार्थ्यांनीदेखील हिरीरीने भाग घेतला. मिशन आॅलिम्पिकतर्फे आत्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायकलिंगची प्रात्यक्षिके दाखविली. ब्रेन वर्ल्डच्या विद्यार्थ्यांनी मंचावर येऊन डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून रंग ओळखून उपस्थितांना आश्चर्यचकित करून सोडले. मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘रॉक बँड’वर गाणे सादर केले. पोदार इटरनॅशनल स्कूल तसेच हव्याप्र मंडळ, विश्वभारती स्कूल, सिपना महाविद्यालय तसेच शहरातील विविध संघटनांनी या धम्माल गल्लीत धम्माल उडवून दिली. असे कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याचा आग्रह धरला (प्रतिनिधी)मातृदिनानिमित्त महिलांचा गौरव ‘लोकमत’ सखी मंचद्वारे मातृदिनानिमित्त महिलांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रफुल्ल गवई यांनी उत्कृष्टरीत्या केले. शेरोशायरी करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली.