अमरावती जिल्हा परिषदेने पटकाविला जनरल चॅम्पियन चषक; अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

By जितेंद्र दखने | Published: February 16, 2024 10:09 PM2024-02-16T22:09:09+5:302024-02-16T22:09:43+5:30

धामणगावच्या बीडीओ माया वानखडे यांनी १५०० मीटर शर्यतीत धावपट्टी गाजविली.

Amravati Zilla Parishad won the General Champion Cup; Officers, staff concluded sports and cultural festival | अमरावती जिल्हा परिषदेने पटकाविला जनरल चॅम्पियन चषक; अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

अमरावती जिल्हा परिषदेने पटकाविला जनरल चॅम्पियन चषक; अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

अमरावती : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात अमरावतीजिल्हा परिषदेने चॅम्पियन चषक प्राप्त करून मैदान गाजविले, तर सांस्कृतिक कार्यक्रमातही आपले प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आपले अस्तित्व दाखविले. धामणगावच्या बीडीओ माया वानखडे यांनी १५०० मीटर शर्यतीत धावपट्टी गाजविली.

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा १६ फेब्रुवारी रोजी येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर पार पडला. सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये क्रिकेट, फुटबाॅल, व्हाॅलीबाॅल, कबड्डी, खो-खो, टेनिक्वाईट, बॅडमिटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण, धावणे, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी या खेळ प्रकारातील यशवंत महिला व पुरुष खेळाडूंनी पारितोषिके पटकाविली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळ (वाशिम), किरण मानकर (यवतमाळ), कॅफो चंद्रशेखर खंडारे, कैलास घोडके, डॉ. पुरुषोत्तम सोळंके, शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने व बीडीओ उपस्थित होते. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, संचालन अजय अडीकने व वनिता बोरोडे आणि आभार प्रदर्शन डॉ. नितीन उंडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

पुरुष क्रिकेटमध्ये यवतमाळ जिल्हा परिषद विजयी ठरली, तर अमरावती जिल्हा परिषद उपविजयी ठरली. महिला क्रिकेटमध्ये यवतमाळ विजयी, तर अकोला उपविजयी झाली. खो-खो पुरुषमध्ये यवतमाळ विजयी झाले, तर अकोला जिल्हा परिषद उपविजयी ठरली. खो-खो महिलामध्ये अमरावती विजयी व वाशिम उपविजयी झाली. कबड्डी पुरुषमध्ये वाशिम व अकोला जिल्हा परिषद उपविजयी झाली. यासह अन्य क्रीडा स्पर्धेत विभागातील जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकारी स्पर्धकांनी विविध क्रीडाप्रकारात बाजी मारली आहे.
 

Web Title: Amravati Zilla Parishad won the General Champion Cup; Officers, staff concluded sports and cultural festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.