शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाचे ‘नॅक’ मू्ल्यांकन जुलैअखेर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST

एसएसआर ऑनलाईन पाठविला, ७० टक्के कागदपत्रे रवाना, ३० टक्के कामे चमू तपासणार अमरावती : कोरोनाच्या उद्रेकाचा शैक्षणिक क्षेत्राला ...

एसएसआर ऑनलाईन पाठविला, ७० टक्के कागदपत्रे रवाना, ३० टक्के कामे चमू तपासणार

अमरावती : कोरोनाच्या उद्रेकाचा शैक्षणिक क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. अनेक विद्यापीठांचे ‘नॅक’मू्ल्यांकन रखडले आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) चमूकडून जुलैअखेर होण्याचे संकेत आहेत. सेल्फ स्टडी रिपोर्ट (एसएसआर) देखील ऑनलाईन पाठविण्यात आला आहे.

दर पाच वर्षांनी विद्यापीठांना ‘नॅक’ मूल्यांकन बंधनकारक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चमूकडून ते केले जाते. तत्पूर्वी शैक्षणिक संस्थांना दिल्ली येथे विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ऑनलाईन एसएसआर पाठवावा लागतो. मात्र, मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आजतागायत तो कायम आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे डिसेंबर २०२० मध्ये होणारे ‘नॅक’ मूल्यांकन होऊ शकले नाही. परंतु, तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने ‘नॅक’ मूल्यांकनासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून ‘नॅक’ची तयारी पूर्ण करण्यात आली. खरे तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकन सहा महिन्यांपूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र, २० जुलैनंतर ‘नॅक’ची चमू येईल, असे संकेत आहेत.

------------------------

‘नॅक’ची चमू पाहणी करणार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘नॅक’संदर्भात कागदोपत्री अहवाल यूजीसीकडे पाठविला आहे. आता केवळ ३० टक्के तपासणीची कामे शिल्लक आहेत. यात प्रत्येक विभागाचे सादरीकरण, विद्यापीठात पायाभूत सुविधा, सामाजिक उत्तरदायित्व, चमूकडून विद्यार्थ्यांशी संवाद, माजी विद्यार्थ्यांची कर्तव्यपूर्ती आदी बाबी ‘नॅक’ची चमू पाहणी करणार आहे. या चमूत पाच ते सहा सदस्य असतील, अशी माहिती आहे.

-------------

विद्यापीठाने ‘नॅक’ मू्ल्यांकनाची तयारी पूर्ण केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ऑनलाईन एसएसआर पाठविला आहे. आता केवळ ‘नॅक’ चमू येण्याची प्रतीक्षा आहे. जुलैअखेर ‘नॅक’ मूल्यांकन होईल.

- अविनाश मोहरील, अधिष्ठाता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.