शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु होणार

By admin | Updated: October 15, 2015 00:19 IST

बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे आता अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु करण्याचे संकेत ...

खासदारांना पत्र : केंद्रीय उड्डयनमंत्री पी. अशोक गजपती राजू यांचे संकेतअमरावती : बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे आता अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु करण्याचे संकेत केंद्रीय उड्डयनमंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी दिले आहेत. एअर बससेवा सुरु करण्यास एअर इंडिया पुढाकार घेणार असल्याचे पत्र खा. आनंदराव अडसूळ यांना प्राप्त झाले आहे.मागील आठवड्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बेलोरा विमानतळाचा विकास, सौंंदर्यीकरणासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेऊन विमानतळाच्या विकासात येणाऱ्या अडचणी सोडविल्या आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बेलोरा विमानतळाच्या विकासाला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच बेलोरा विमानतळावरुन ‘एअरबस’ सेवा सुरु होण्याचे हे संकेत मानले जात आहेत. अमरावती-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरु केल्यास प्रवासीवर्ग मोठ्या प्रमाणात मिळू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, एअर इंडिया कंपनीची अमरावती-मुंबई विमान सेवा सुरु नाही. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केल्यास ही विमानसेवा फायदेशीर ठरणार, असे विमानतळ प्राधिकरणाने केंद्राकडे पाठविलेल्या अहवालात नमूद केले आहे. मात्र, खा.अडसूळ यांनी बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासह येथून छोट्या स्वरुपाची विमानसेवा सुरु करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच धर्तीवर केंद्रीय उड्डयनमंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी खासदार अडसुळांना पत्र पाठवून विमानसेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. बेलोरा विमानतळाचे विकास कार्य आटोपले की छोटे विमान सुरु करणे सुकर होईल, असे चित्र आहे. मात्र विमानतळाच्या विकासासाठी निधीची गरज असल्याने राज्य शासनाने हा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)बेलोरा विमानतळावरुन विमान सेवा सुरु करण्याची फार जुनी मागणी आहे. त्यानुसार वारंवार पत्रव्यवहार सुरुच आहे. केंद्रीय उड्डयनमंत्र्यांनी विमानसेवा सुरु करण्याचे दिलेले संकेत जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरतील.- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.