Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:38 IST2025-09-30T16:36:38+5:302025-09-30T16:38:11+5:30
अमरावती शहरात एका तरुणाने प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं वाचा?

Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
Amravati Crime news: गर्लफ्रेंडसोबत वाद झाला. गर्लफ्रेंड त्याला टाळू लागली. पण, वाद तेव्हा वाढला जेव्हा तरुणी थेट पोलीस ठाण्यातच पोहोचली. हे तरुणाला कळलं आणि मग सुरू झाला थरार. तरुण सहाव्या मजल्यावर गेला. त्याला खाली उतरवताना पोलिसांना घाम फुटला तर उपस्थितांचाही श्वास रोखला गेला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमरावती शहरातील पुंडलिक बाबा नगरमध्ये ही घटना घडली. २४ वर्षीय तरुणाचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये वाद झाला होता. नेमका कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. तरुणासोबत वाद झाल्यानंतर मुलीने त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. त्याला टाळू लागली.
तरुणी पोहोचली पोलीस ठाण्यात
सुरुवातीला तरुणीने त्याला टाळलं. पण, नंतर ती त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. प्रेयसी पोलीस ठाण्यात गेली असल्याचे तरुणाला कळले आणि तो नाराज झाला.
तो पुंडलिक बाबा नगरमधील एका इमारतीत गेला. सहाव्या मजल्यावर जाऊन त्याने गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यातच होती. त्याने तिला आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी कसं वाचवलं?
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. सगळे त्याला समजावू लागले. पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्याला समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, तो ऐकायला तयार नव्हता. गाडगे नगर पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
अखेर त्याला बोलण्यात गुंतवून पोलिसांनी त्याला पकडले आणि खाली आणले. पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.