मित्रानेच केला मित्राचा गेम! अमरावतीत क्षुल्लक वादातून नर्सिंगच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून हत्या; आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 21:19 IST2026-05-17T21:19:08+5:302026-05-17T21:19:08+5:30

दर्यापुरात १९ वर्षीय युवकाचा निर्घृण खून

Amravati 21 year old man stabs nursing student friend to death over minor dispute in Daryapur | मित्रानेच केला मित्राचा गेम! अमरावतीत क्षुल्लक वादातून नर्सिंगच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून हत्या; आरोपी जेरबंद

मित्रानेच केला मित्राचा गेम! अमरावतीत क्षुल्लक वादातून नर्सिंगच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून हत्या; आरोपी जेरबंद

सचिन मानकर

Amravati Crime: मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून संशयी वृत्ती बळावली आणि एकाने दुसऱ्याला चाकूने आठ वार करून  राहत्या घरी संपविले. दर्यापूर शहरातील आनंदनगर भागात रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला जेरबंद केले आहे. 

पोलिस सूत्रांनुसार, प्रज्वल देवानंद तायडे (१९, रा. आनंदनगर, दर्यापूर) असे मृत युवकाचे आणि कुणाल प्रवीण गावंडे (२१, रा. आनंदनगर) असे मारेकऱ्याचे नाव आहे. ते दोघे मित्र होते. मृत प्रज्वल हा मूर्तिजापूर (जि. अकोला) येथे नर्सिंग चे शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी ११:३० वाजता प्रज्वलच्या घरात आजोबांशिवाय अन्य कोणी नसल्याचे लक्षात घेऊन कुणालने त्याच्या घरात प्रवेश केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि कुणालने जवळच्या धारदार चाकूने प्रज्वलवर एकूण आठ वार केले. यात प्रज्वल गंभीर जखमी झाला. मदतीसाठी त्याची आरडाओरड ऐकून शेजारच्या नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

दर्यापूर पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व ठाणेदारांच्या मार्गदर्शनात आरोपीला हुडकून काढण्यासाठी मोहीम आखली. अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ञांची टीम दाखल झाली होती.

Web Title : अमरावती: मामूली विवाद में दोस्त ने की दोस्त की हत्या, आरोपी गिरफ्तार

Web Summary : अमरावती में एक मामूली विवाद के बाद एक दोस्त ने दूसरे दोस्त की हत्या कर दी। आरोपी ने दर्यापुर स्थित उसके घर में नर्सिंग के छात्र को आठ बार चाकू मारा। पुलिस ने भागने की कोशिश कर रहे आरोपी को गिरफ्तार कर लिया। घटना रविवार सुबह हुई।

Web Title : Friend Kills Friend Over Petty Argument in Amravati; Accused Arrested

Web Summary : In Amravati, a nursing student was murdered by his friend after a minor dispute escalated. The accused stabbed the victim eight times at his home in Daryapur. Police arrested the suspect who was planning to escape. The incident occurred Sunday morning.